मुंगशी येथे आपतग्रस्त शेतकरी कुटुंबास दिली आर्थिक मदत

कुलभुषण विभुते
Sunday, 18 October 2020

शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत करावी, शेतीचे वीज माफ करावे, शासनाने आता शेतकऱ्याचा अंत पाहू नये, तात्काळ मदत द्यावी, अशा मागण्या शेतकऱ्यांकडून होत आहेत. रविवारी मिरगणे यांनी बार्शी तालुक्‍यातील वैराग, पिंपरी, तडवळे, दहिटणे, मुंगशी (वा.), साकत, काळेगाव, मालेगाव, घाणेगाव आदी गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. 

वैराग(सोलापूर): मुंगशी (वा.) (ता. बार्शी) येथील नागझरी नदीच्या पुरात वाहून गेलेले शेतकरी निवृत्ती रंगनाथ ताटे यांच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी भेट देऊन आर्थिक मदत केली. घटना घडून पाच दिवस लोटले तरीही नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शासनाचा अधिकारी वा कर्मचारी गावास फिरकला नसल्याची समस्या ग्रामस्थांनी यावेळी मांडली. 

हेही वाचाः अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचा सर सय्यद एक्‍सलेन्स पुरस्काराने सन्मान 

शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत करावी, शेतीचे वीज माफ करावे, शासनाने आता शेतकऱ्याचा अंत पाहू नये, तात्काळ मदत द्यावी, अशा मागण्या शेतकऱ्यांकडून होत आहेत. रविवारी मिरगणे यांनी बार्शी तालुक्‍यातील वैराग, पिंपरी, तडवळे, दहिटणे, मुंगशी (वा.), साकत, काळेगाव, मालेगाव, घाणेगाव आदी गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. 

हेही वाचाः शेतकरी ते उद्योजिका सारिका पाटील यांचा प्रवास 

ग्रामस्थांच्या अडचणी व समस्या जाणून घेत राज्याचे मुख्य सचिव संजीवकुमार, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, गटविकास अधिकारी शेखर सावंत आदींना मुंगशी ग्रामस्थांच्या नुकसानीची माहिती दिली. शिवाय पाच दिवस होऊनही शासकिय यंत्रनेकडून पहाणी अथवा नुकसानीचे पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. तालुक्‍यात द्राक्षबागा पडून नुकसान झालेला पहिला नुकसान पंचनामा प्रशासनाकडून मिरगणे यांनी करून घेतला. शिवाय पुरात वाहून गेलेल्या शेतकरी निवृत्ती रंगनाथ ताटे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा धनादेश संगिता बापूराव क्षीरसागर यांना दिला. यावेळी बाळासाहेब पवार, शिक्षक नेते श्रीधर गोरे, ऍड. जीवनदत्त आरगडे, अविनाश शिंदे, राजाभाऊ गायकवाड, रामेश्वर स्वामी, रविंद्र सांगुळे, संभाजी आरगडे उपस्थित होते. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial assistance given to the distressed farmer family at Mungshi