सोलापूरचा झेंडा मणिकोंडा नगरपालिकेत

Flag of Solapur in Manikonda Municipality
Flag of Solapur in Manikonda Municipality
Updated on

सोलापूर : सोलापुरातील नरसिंग गिरजी मिल कामगार रामचंद्र स्वामी यांचे पुत्र श्रीकांत हे घरच्या बिकट परिस्थितीवर मात करून हैदराबाद येथील मणिकोंडा नगरपालिकेत नगरसेवक झाले आहेत. 
श्री. स्वामी हे मूळचे सोलापुरातील भय्या चौकात राहणारे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्‍वर महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत होते. यादरम्यान, महाविद्यालय व सामाजिक प्रश्‍नांवरील आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदविला आहे. 
हेही वाचा- राज्यातील शिक्षकांच्या  उन्हाळी सुटीला यंदा `खो` ... हे आहे कारण
विद्यार्थी दशेनंतर त्यांनी नवी पेठेतील एका दुकानात एक हजार रुपयांवर काम केले. त्यानंतर ते व्यवसायासाठी सांगली येथे गेले. तेथून पुढे व्यवसायानिमित्त व त्यांचे आजोळ हैदराबाद असल्याने श्रीकांत त्याच ठिकाणी स्थायिक झाले. सध्या त्यांच्या पुणे, सांगली, हैदराबाद येथे वेबसाइट डेव्हलपमेंटच्या कंपन्या आहेत. 
मणिकोंडा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक नऊमध्ये अलका टाऊनशिप नावाची 20 हजारांची नागरी वसाहत आहे. या ठिकाणी भौतिक सोयीसुविधांचा अभाव आहे. या टाऊनशिपमध्ये आजही टॅंकरने पाणीपुरवठा होतो. यासाठी नागरिकांना सोबत घेऊन श्रीकांत यांनी एक समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलने, उपोषण केली. पुढे या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या परिसरातील समस्या सोडवायच्या असतील तर आपल्यातील एकजण नगरसेवक व्हायला हवा, असा विचार केला. यातून श्रीकांत यांचे नाव पुढे आले. निवडणूक लागल्यावर श्रीकांत यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवत विजयही प्राप्त केला. त्यामुळे ते आज नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहत आहेत. आजही त्यांच्या मोठ्या बंधूचे सोलापुरात दुकान आहे. त्यांना दोन बहिणी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.
solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
Marathi News Esakal
www.esakal.com