उजनी जलाशयातील पाण्याने साठवण, पाझर तलाव भरून द्या : दिलीप माने 

दयानंद कुंभार 
Thursday, 3 September 2020

भीमा नदीत येणारे अतिरिक्त पाणी सोडताना कालव्यात सोडून या क्षेत्रातील विशेषत: मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांतील कालव्याच्या शेवटच्या भागात ओढे, नाले यामधून सोडून सर्व साठवण तलाव, पाझर तलाव, शेततळे नालाबांध, सिमेंट बंधारे भरून द्यावेत. उजनी जलाशयातील कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पुराचे पाणी या क्षेत्राच्या भागापर्यंत टेल टू हेड भरून देण्याची मागणी माजी आमदार माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

वडाळा (सोलापूर) : उजनी जलाशयातून पावसाचे व भीमा नदीत येणारे अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे सोडून लाभक्षेत्रातील साठवण पाझर गाव तलाव, सिमेंट केटी वेअर बंधारा, शेततळे भरून देण्याची मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. 

हेही वाचा : मोठी बातमी! बंद प्राणी संग्रहालयावर दरमहा "इतका' होतोय खर्च; नियमित मान्यतेसाठी वेट अँड वॉच 

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण शंभर टक्के भरले असून उर्वरित पावसाळा व भीमा नदीत येणारे अतिरिक्त पाणी सोडताना कालव्यात सोडून या क्षेत्रातील विशेषत: मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांतील कालव्याच्या शेवटच्या भागात ओढे, नाले यामधून सोडून सर्व साठवण तलाव, पाझर तलाव, शेततळे नालाबांध, सिमेंट बंधारे भरून द्यावेत. उजनी जलाशयातील कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पुराचे पाणी या क्षेत्राच्या भागापर्यंत टेल टू हेड भरून देण्याची मागणी माजी आमदार माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

हेही वाचा : ऍसिड हल्ल्याची धमकी देऊन युवतीचा मानसिक छळ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल 

या वेळी माने यांनी उजनी धरणातील पाणी कालव्याद्वारे सोडून उत्तर सोलापूर तालुक्‍यातील एकरुख तलावासह दारफळ बीबी, दारफळ गावडी येथील साठवण तलाव तसेच दक्षिण सोलापूरमधील होटगी, मंद्रूप, निंबर्गी, कंदलगाव, येळेगाव, वडापूर आदी तलाव, या लाभ क्षेत्रातील शेततळी, नालाबांध, सिमेंट बंधारे, केटी बंधारे भरून मुक्तपणे पाणीसाठा करून द्यावा, असे सांगितले. 

या वेळी सभापती रजनी भडकुंबे, पंचायत समितीचे सदस्य हरिभाऊ शिंदे, गंगाधर बिराजदार, संभाजी भडकुंबे, अप्पासाहेब काळे, राम गायकवाड, प्रथमेश पाटील, विकास पाटील, श्रीकांत पाटील, महेश घाडगे, नागनाथ माने, बाबासाहेब पाटील, उमेश भगत, संभाजी पाटील, अजित भिंगारे, सोमनाथ वाघमोडे, तात्या कदम, नानासाहेब पवार, वैजनाथ भोसले, प्रताप टेकाळे, प्रमोद शिंदे, रणजित दवेवाले, नागेश म्हेत्रे, अजय सोनटक्के आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Dilip Mane demanded storage of water from Ujani reservoir and filling of ponds