वारंवार लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक अडचणीत 

राजाराम माने 
Thursday, 10 September 2020

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने सात महिन्यांपासून सतत लॉकडाउन वाढतच चालले आहे. लॉकडाउन केले नाही तर रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. सतत होणाऱ्या लॉकडाउनचा शासनानेच एकदा निर्णय घ्यावा; कारण स्थानिक पातळीवर हा निर्णय होत असल्याने यामध्ये छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात भरडला जात आहे. यापुढे लॉकडाउन नको, असे छोटे व्यावसायिक म्हणत आहेत. 

केत्तूर (सोलापूर) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तुटावी म्हणून ग्रामीण भागात सतत लॉकडाउन वाढत असल्याने चहा, पान, सायकल, स्टेशनरी, चप्पल, संगणक केंद्रे, थंडपेय दुकाने, कापड दुकाने, छोटे हॉटेल, सलून आदी छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. दुकान गाळा भाड्याने घेऊन सुरू केलेल्या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे आर्थिक संकटात आले आहेत. त्यामुळे यापुढे लॉकडाउन करू नये, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

हेही वाचा : कौतुकास्पद! "कॅम स्कॅनर' बंद झालं म्हणून नाराज होऊ नका, त्याला टक्कर देण्यासाठी आलंय सोलापूरचे "स्कॅन इट इंडिया'! 

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने सात महिन्यांपासून सतत लॉकडाउन वाढतच चालले आहे. लॉकडाउन केले नाही तर रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. सतत होणाऱ्या लॉकडाउनचा शासनानेच एकदा निर्णय घ्यावा; कारण स्थानिक पातळीवर हा निर्णय होत असल्याने यामध्ये छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात भरडला जात आहे. यापुढे लॉकडाउन नको, असे छोटे व्यावसायिक म्हणत आहेत. होणारा कौटुंबिक खर्च तर चुकत नाही परंतु येणारे उत्पन्न लॉकडाउनमुळे बंद पडले आहे. हे केव्हा पूर्वीसारखे सुरळीत होणार हे आताच कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांपुढील अडचणी मात्र वरचेवर वाढत चालल्या आहेत. 

हेही वाचा : पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करा : "स्वाभिमानी'ची तहसीलदारांकडे 

केत्तूर येथील सलून व्यावसायिक धनंजय देवकर म्हणाले, ज्या व्यवसायावर रोजची रोजीरोटी चालते तो व्यवसाय सारखा बंद ठेवावा लागत असल्याने अडचणीत भर पडली आहे. 

व्यावसायिक हनुमंत ठोंबरे म्हणाले, रोजच्या व्यावसायातून घरखर्च भागत होता. गेल्या सात महिन्यांत बॅंक बॅलन्सही संपत आला आहे. आता भांडवल आणायचे कोठून, असा प्रश्‍न पडला आहे. लॉकडाउन उठल्यास आमचा व्यवसाय सुरळीत होईल. 

केत्तूरच्या सारिका माने म्हणाल्या. ग्राहकांची संख्याही मर्यादित झाली आहे. त्यातच खरेदीसाठी मोठ्या शहरात जाणे धोकादायक बनले आहे. छोट्या खरेदीसाठी वाहन खर्च परवडत नाही. हा लॉकडाउनमुळे व्यवसायात वरचेवर अडचणी वाढत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Frequent lockdowns have put small businesses in rural areas at a disadvantage