'त्याने' कोरोनाचा असाही घेतला गैरफायदा...! गोव्यातून सात महिन्यांचे बाळ पळवणाऱ्याला जामीन

mote news photo.jpg
mote news photo.jpg

सोलापूर ः लॉकडाउनमुळे राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमा परवानगीशिवाय ओलांडता येत नाहीत. जागोजागी पोलिसांचा पहारा, दिमतीला शिक्षकही. अशातच भर पावसात 7 ऑगस्ट रोजी गवसे ता. आजरा जि. कोल्हापूर येथे सात महिन्याच्या बाळासह एकजण आढळला. आपलं मूळ गाव सोलापूर असून पत्नी सोडून गेल्याने आपण गावी जात असल्याचे सांगितल्याने सहानुभूतीने त्याला मदत करत सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनात पोलिसांनी पाठवले. अकलूज येथे 9 ऑगस्ट रोजी पोलिसांनी संशयावरून अटक केल्यावर आपण गोवा येथून हे बाळ चोरून आणल्याचे सांगितले.

हनुमंत डोंबाळे वय 65 शेळगाव ता. इंदापूर हा इसम सात आठ महिन्याच्या बाळाला घेऊन गवसे ता. आजरा जिल्हा कोल्हापूर येथे आढळला. येथील कोविड ड्युटीवरील शिक्षक व पोलिसांनी चौकशी केली असता. आपण गोवा येथून आलो असून पत्नी बाळाला व मला सोडून निघून गेल्याचे सांगितले. संबधित पोलिस व शिक्षकांनी सहानुभूतीने त्याला जेवण बाळाला दूध, खर्चाला पैसे देऊन इचलकरंजीपर्यंत जाणाऱ्या वाहनात बसवून पाठवले. 9 ऑगस्ट रोजी पहाटे अकलूज येथे हनुमंत संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी चौकशी करून अटक केली होती. आज त्याला जामीनही मिळाला. 

कोरोनामुळे पोलिस व प्रशासन सहानुभूतीने विचार करतात मात्र, अनेकजण त्याचा गैरफायदा घेतात. आजरा येथे पोलिसांनीच बाळासह वाहनात बसवून पाठवलेले इसम अकलूज पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हनुमंत हा मागील 16 वर्षांपासून घरी आलेला नाही. त्याची पत्नी माहेरी बारगांवमळा, एकशीव ता. माळशिरस येथे राहते. त्याला एक विवाहित मुलगी व अठरा वर्षाचा मुलगा आहे, अशी माहिती पुढे आली. संबधित नेमकं कोण, कुठून आणले याचा तपास अकलूज पोलिस करत असून बाळ पंढरपूर येथे अनाथश्रामात दाखल केले आहे. दरम्यान मडगाव- गोवा येथील पोलिसांना संपर्क साधला असता गोव्यात कुठेही बाळ चोरीला गेल्याची पोलिसात तक्रार नोंद नसल्याचे सांगण्यात आले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती असाही गैरफायदा घेतला जात आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com