जोरदार पावसाने आळगे व हिळ्ळी बंधारा ओव्हरफ्लो 

राजशेखर चौधरी
Friday, 18 September 2020

आज दुपारी चार वाजता वाजल्याच्या माहितीनुसार उजनी धरण पाच हजार आणि वीर धरण दहा हजार,सीना नदी दहा हजार,माण नदी वीस हजार क्‍यूसेक्‍स प्रति सेकंद असे कमी जास्त प्रवाहात पाणी खाली येत आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर देखील अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाल्याने सर्व ओढे भीमा नदीला मिळत आहेत याचा एकत्रित परिणाम म्हणून आळगे व हिळ्ळी बंधारा येथे प्रवाह 40 हजार क्‍यूसेक्‍स प्रती सेकंद पर्यंत झालेले पहावयास मिळाले आहे असे उपविभागीय अभियंता नागेश जडे यांनी सांगितले. 

अक्कलकोट (सोलापूर) : मागील आठवड्यात पुन्हा उजनीच्या लाभक्षेत्रात आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मोठ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्‍यातील भीमा नदीवरील हिंळ्ळी व आळगे बंधारा आज दुपारी 1 वाजल्यापासूनच ओव्हरफ्लो झाला आहे. बंधाऱ्याच्या वरून दोन फूट उंचीवर पाणी वाहत आहे. 

हेही वाचाः जोरदार पावसाने मारापूर परिसरात पिके पाण्याखाली 

आज दुपारी चार वाजता वाजल्याच्या माहितीनुसार उजनी धरण पाच हजार आणि वीर धरण दहा हजार,सीना नदी दहा हजार,माण नदी वीस हजार क्‍यूसेक्‍स प्रति सेकंद असे कमी जास्त प्रवाहात पाणी खाली येत आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर देखील अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाल्याने सर्व ओढे भीमा नदीला मिळत आहेत याचा एकत्रित परिणाम म्हणून आळगे व हिळ्ळी बंधारा येथे प्रवाह 40 हजार क्‍यूसेक्‍स प्रती सेकंद पर्यंत झालेले पहावयास मिळाले आहे असे उपविभागीय अभियंता नागेश जडे यांनी सांगितले. 

हेही वाचाः अक्कलकोट तालुकाः 27 पेक्षा जास्त व धार्मिक व निसर्ग पर्यटन स्थळांचे वैभव 

स्थानिक सोलापूर जिल्ह्यातील परिसरातला पाऊस याचा विचार करता धऱणात पाणी वाढलेले दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 
दरम्यान नदीकाठी आणलेल्या मोटारी व इतर शेती साहित्य नदीकाठच्या शेतकऱ्यांची पून्हा काढण्यासाठी मागील आठवड्यापासून धावपळ सुरूच आहे. या परिस्थितीत पाणी वाढल्यास हिळ्ळी मार्गे कर्नाटकातील गुब्याड वरून इंडी व विजयपूर कडे जाणारा मार्ग आणि आळगी बंधाऱ्यांवरून हलसंगी व इंडिकडे जाणारे मार्ग बंद झालेले आहेत. 
बंधाऱ्यातील मोठ्या प्रमाणात आलेले पाणी पाहून गावकऱ्यांनी व परिसरातील नागरिक वाहने धुणे व नदीतील पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत. 
दरम्यान दरवेळी या दोन्ही बंधाऱ्यावरील तसेच खानापूर बंधारे आणखी जास्त ओव्हरफ्लो होऊन बंधाऱ्यावर दहा फुटापेक्षा जास्त पाणी झाल्यास हिळ्ळी, कुडल, शेषगिरी, आळगे शेगांव, गुडेवाडी, धारसंग, व अंकलगे ही गावे प्रभावित होत असतात. त्यांना भीमा नदी पलीकडे जाण्याचा मार्ग बंद होत असतो पण आता पाणी एवढे अजून वाढलेले नाही. मुख्यतः उजनी व वीर मधून आणखी पाणी जास्त सोडल्यास अक्कलकोट तालुक्‍यातील भीमा नदी काठी असलेली ऊस व इतर शेती पाण्याखाली जाणार आहे.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains overflow the Alge and Hilli dams