"देऋब्रा' तर्फे गुणवंतांचा गौरव व शिष्यवृत्तीचे वाटप 

शाम जोशी
Sunday, 22 November 2020

यावेळी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचेही वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम प्रातिनिधीक स्वरूपात झाला. यावेळी केवळ 10 विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती वाटपासह गौरव करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. यावेळी प्रमुख कार्यवाह श्‍याम जोशी, उपाध्यक्ष शंकरराव कुलकर्णी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, श्रीकांत तुळजापूरकर, दत्तात्रय आराध्ये, विजय कुलकर्णी, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुनील हरहरे आदीसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

द. सोलापूर (सोलापूर)ः येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे दहावी आणि बारावीत 80 टक्केपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. 

हेही वाचाः मागील वर्षीच्या तुलनेत बाजारपेठेत दिवाळीची साठ टक्के उलाढाल 

यावेळी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचेही वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम प्रातिनिधीक स्वरूपात झाला. यावेळी केवळ 10 विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती वाटपासह गौरव करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. यावेळी प्रमुख कार्यवाह श्‍याम जोशी, उपाध्यक्ष शंकरराव कुलकर्णी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, श्रीकांत तुळजापूरकर, दत्तात्रय आराध्ये, विजय कुलकर्णी, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुनील हरहरे आदीसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

हेही वाचाः पाण्याच्या निळाईत देखण्या लालसरी पक्ष्यांचा आनंददायी विहार 

यावेळी केवळ परीक्षेत गुणवान असण्याबरोबरच व्यवहारात गुणवंत होण्यासाठी ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे आवाहन डॉ. येळेगावकर यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नसल्याने सर्वांनीच कोरोनाबाबतच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पालकांच्यावतीने पत्रकार पुरूषोत्तम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनीही संस्थेकडून मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवावी तसेच पैसे बचत करण्याची सवय लावून घ्यावी असे आवाहन केले. कार्यवाह श्‍याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय आराध्ये यांनी आभार मानले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Honor of merit and distribution of scholarships by "Debra"