मागील वर्षीच्या तुलनेत बाजारपेठेत दिवाळीत साठ टक्के उलाढाल 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 22 November 2020

लॉकडाउनच्या काळात ठप्प झालेल्या बाजारपेठेला दिवाळीचा सण ही एक मोठी आशा होती.लॉकडाउन उठल्यानंतर बाजारपेठेतील उलाढाल वाढणे आवश्‍यक झाले होते. जोपर्यंत खरेदीला ग्राहक बाजारात येत नाही तोपर्यंत उत्पादन ते विक्रीचे हे अर्थचक्र फिरणार नाही असे मानले जात होते. त्यानंतर दिवाळी बाजारपेठेने मात्र अनेक बदल घडवून आणले. प्रशासनाने खरेदीसाठी दुकाने चालु ठेवण्याच्या वेळा वाढवल्या होत्या. 

 

सोलापूरः दिवाळीच्या सणाने बाजारपेठेला बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. सोनेचांदी, मिठाई, मोबाईल, तयार फराळ, कपडे आदी अनेक वस्तुची खरेदी अगदी जोरात झाली. सोने चांदी व्मापार्यांना अधिक मासात चांदी खरेदी व नंतर दिवाळीत सोने खरेदी चांगली झाली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी साठ टक्के खरेदी ग्राहकांनी केली आहे. आता बाजारपेठेला लग्नसराईचे वेध लागले आहेत. 

हेही वाचाः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती उत्साहात 

लॉकडाउनच्या काळात ठप्प झालेल्या बाजारपेठेला दिवाळीचा सण ही एक मोठी आशा होती.लॉकडाउन उठल्यानंतर बाजारपेठेतील उलाढाल वाढणे आवश्‍यक झाले होते. जोपर्यंत खरेदीला ग्राहक बाजारात येत नाही तोपर्यंत उत्पादन ते विक्रीचे हे अर्थचक्र फिरणार नाही असे मानले जात होते. त्यानंतर दिवाळी बाजारपेठेने मात्र अनेक बदल घडवून आणले. प्रशासनाने खरेदीसाठी दुकाने चालु ठेवण्याच्या वेळा वाढवल्या होत्या. 

हेही वाचाः कार्तिकी यात्रा काळात प्रवाशी वाहतूक सुरुच राहणार 

दिवाळी बाजारपेठेत ग्राहकांनी मोबाईल खरेदीला मोठा प्रतिसाद दिला. त्यामध्ये प्राधान्याने ऑनलाईन शिक्षणाची गरज म्हणून खरेदी झाली. नव्या मोबाईलसोबत जुन्या मोबाईलची खरेदी देखील वाढलेली होती. दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली गेली. धान्या बाजारात मात्र उलाढाल सामान्यच राहिली होती. दिवाळीसाठी तयार फराळ व मिठाईला अधिक पसंती दिली गेली. मागील वर्षीच्या तुलनेत तयार फराळ व मिठाईचा आकडा दुपटीपर्यंत वाढलेला होता. 
या शिवाय वाहन खरेदीला देखील प्रतिसाद खुपच अधिक होता. कोरोनाच्या सुरक्षिततेसाठी चारचाकी वाहनाची खरेदी अधिक प्रमाणात केली गेली. तसेच त्यासाठी अजुनही गाड्यांचे खरेदीची प्रतिक्षा यादी कायम आहे. दुचाकी पेक्षा चारचाकी वाहन खरेदीचा प्रतिसाद खुपच अधिक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची दिवाळी बाजाराची उलाढाल साठ टक्‍क्‍यापर्यंत गेली आहे. अजुनही कोरोनाचे संकट कायम असले तरी लग्नसराईमध्ये बाजारपेठ अधिक मजबूत होईल असा व्यापाऱ्यांचा विश्‍वास आहे. 

बाजारपेठेला दिलासा 
मागील वर्षीच्या तुलनेत दिवाळी बाजाराची उलाढाल साठ टक्‍क्‍यापर्यंत गेली आहे. मात्र बाजारपेठ चांगल्या पध्दतीने सावरली जात आहे ही बाब सोलापूरच्या अर्थकारणासाठी महत्वाची आहे. 
- राजू राठी, अध्यक्ष सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixty per cent turnover in the market on Diwali compared to last year