शाळकरी मुलांचा किलबिलाट कधी थांबेल असे वाटलेच नाही ! 

प्रकाश सनपूरकर
Friday, 18 September 2020

शाळेच्या मुलांना ऍटोमध्ये शाळेत ने-आण करणारे रावडे मागील काही वर्षापासून हे काम करतात. हरिभाई देवकरण व नूतन मराठी विद्यालयाचे विद्यार्थ्यांची ते ने-आण करतात. नियमीत मासिक कमाई हा त्यांचा आधार होता. घरामध्ये पत्नी, नात, मुलगा, बहिण व सून असे सहा जणांचे कुटुंब. मार्चमध्ये ऍटोरिक्षा बंद पडली तेव्हा त्यांच्या हातात शाळेच्या वाहतुकीचे शेवटचे पंधरा हजार आले होते. 

सोलापूरः माझ्या ऍटोमध्ये बसून शाळेत जाणाऱ्या मुलांच्या किलबिलाटासोबत दिवसभर धावपळ करण्याचे दिवस आठवतात. ही कमाई कधी बंद होईल असे वाटलेही नव्हते. पहाटे पाचवाजल्यापासून रिक्षा बाहेर काढल्यानंतर शंभर ते दिडशे रुपये मिळतात. उधारीच्या किराणावर जेवण मिळतं एवढच मानाव लागतय. आता शाळा कधी सुरू होतील याची वाट पाहतोय, ही भावना आहे मौलाली चौकातील स्कूल रिक्षा चालवणाऱ्या हनोक रावडे या स्कूल ऍटोचालकाची. 

हेही वाचाः जोरदार पावसाने मारापुर परिसरात पावसाने पिके पाण्याखाली 

शाळेच्या मुलांना ऍटोमध्ये शाळेत ने-आण करणारे रावडे मागील काही वर्षापासून हे काम करतात. हरिभाई देवकरण व नूतन मराठी विद्यालयाचे विद्यार्थ्यांची ते ने-आण करतात. नियमीत मासिक कमाई हा त्यांचा आधार होता. घरामध्ये पत्नी, नात, मुलगा, बहिण व सून असे सहा जणांचे कुटुंब. मार्चमध्ये ऍटोरिक्षा बंद पडली तेव्हा त्यांच्या हातात शाळेच्या वाहतुकीचे शेवटचे पंधरा हजार आले होते. 

हेही वाचाः अक्कलकोट तालुक्‍यात ः 27 पेक्षा धार्मिक व निसर्ग पर्यटन स्थळांचे वैभव 

या पैशावर संकट टळेल म्हणून ते घरी थांबले. नंतर शाळाही जूनमध्ये सुरू होतील ही आशा होती. पण शाळा सुरु होण्याची शक्‍यता मावळत गेली. घरात असलेले पैसे घरखर्चात संपले. आता काय करायचे म्हणून शेजाऱ्याकडे विचारणा केली. वीस वर्षापासून किराणा देणाऱ्या अडके दुकानदाराने त्यांना उधारीवर किराणा माल देण्यास सुरुवात केली. तरीही ऍटो चालल्याशिवाय कमाईचे चक्र सुरु होणे अशक्‍य होते. 
ऍटोच्या कर्जाचा हप्ता पाच हजार 700 रुपये त्यांना तीन महिने भरता आला नाही. नंतर वाढलेला हप्ता भरण्यासाठी पुन्हा कर्ज घेण्याची वेळ आली. खासगी सावकाराचे 30 हजार रुपये घेऊन पुन्हा गाडीचा हप्ता फेडला तर सावकाराच्या व्याजाचा 621 रुपये नवीन हप्ता सुरू झाला. अधिक कमाई होईल म्हणून पहाटे पाच वाजल्यापासून ऍटो बाहेर काढला. पण गिऱ्हाईक कोरोनाच्या भीतीने कमी झाले होते. त्यामुळे याही महिन्यात पुन्हा उधारीवर घर चालवले. 

गाडीच्या हप्त्याची रक्कमही जमा होत नाही 
बाजारात दिवसभर फिरून कधी शंभर तर कधी दिडशे रुपयांची कमाई होत आहे. तरीही गाडीच्या हप्त्याची रक्कम महिनाभरात जमा होत नाही. घरखर्च व खासगी सावकाराच्या व्याजासाठी पुन्हा उधारी पैसे आणून फेडतोय एवढेच हाती आहे असे रावडे यांनी सांगितले. 

स्कूल ऍटोचालकांचे अर्थकारण 
- शहरात स्कू ल ऍटो ः 5000 
- स्कूल ऍटोशी जोडलेल्या शाळा व कोचिंगक्‍लास ः 80 
- स्कुल ऍटोवर अवलंबित संख्या ः 25000 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I never thought that the chirping of school children would stop!