साधारण पाऊस झाला तर चक्क अतिवृष्टीची नोंद, कुठे ते वाचा 

rain.jpg
rain.jpg
Updated on

मंगळवेढा(सोलापूर)ः दोन दिवसापुर्वी झालेला पावसाबद्दल स्कायमेट कडून अतिवृष्टी नोंदवल्याची आकडेवारी समोर आली. प्रत्यक्षात अतिवृष्टी नसताना त्याची नोंद झाळ्याने पुढील काळात स्कायमेट व महसूल मधील पावसाच्या नोंदी चा फटका भविष्यात पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. 

गतवर्षी हवामानावर आधारित पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे निकष ठरवताना विमा कंपनीने स्कायमेट या संस्थेने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेतला आहे. तालुक्‍यातील मंगळवेढा, मरवडे,भोसे या महसूल मंडळात डाळिंब पिकाची भरपाई मिळू शकली नाही. या पावसाच्या नोंदीवरून तुरीचे उंबरठा उत्पादन वाढले म्हणून तुरीपासून तालुक्‍यातील शेतकरी 19 हजार शेतकरी वगळले. 

मागील दोन दिवसात तालुक्‍यात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होऊ लागल्या आहेत. 17 जून सकाळी 7 वाजेपर्यंत तालुक्‍यातील विविध महसूल मंडळामध्ये पावसाची नोंद केली आहे. मंगळवेढा 57 मिमी, मरवडे 27, भोसे 18,आंधळगाव 54, हुलजंती 08, मारापुर 60, बोराळे 57 मि.मी असा आहे. तर स्कायमेट या संस्थेकडे नोंदवलेल्या पावसामध्ये भोसे वगळता इतर सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. त्या संदर्भातील आकडेवारी तालुक्‍यातील सोशल मीडियामध्ये फिरू लागल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला आहे. 
तालुक्‍यामध्ये पडलेल्या पावसाची नोंद महसूल खात्याकडे बरोबर असताना स्कॉयमेटचा आधारे अतिवृष्टी झाली असेल तर शेतकऱ्यांचे नुकसान होणे अपेक्षित होते. पण अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे नुकसानीची नोंद नाही. या स्कॉयमेटच्या तांत्रिक बिघाडाचा फटका यंदाच्या हंगामात खरीप व हवामानावर आधारित विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सदरच्या आकडेवारी बाबतीत या संस्थेकडे काम करणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे बोट दाखविले. 

प्रकरणात लक्ष घातले जाईल 
पावसाच्या आकडेवारीतील तफावतीच्या प्रकरणात लक्ष घातले जाईल 
-स्वप्निल रावडे, तहसिलदार 

गावस्तरावर यंत्रणा हवी 
शासनाने स्कायमेट व महसूल खात्याच्या पावसाच्या नोंदीसाठी मंडळस्तरावर अवलंबून न राहता प्रत्येक गावस्तरावर यंत्रणा बसवावी. 
- बिरू घोगरे, तालुकाध्यक्ष प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना समिती.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com