
सोलापूरः मागील काही वर्षात वन्य जीवन रक्षणाचे झालेले प्रयत्न, जपलेली जैवविविधतेला या वर्षी भरपूर पावसाची जोड मिळाली आहे. वन्यपशूंनी समृध्द झालेली माळरानामध्ये आता लांडगा, काळवीट व खोकड अशा प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे निसर्गप्रेमींच्या निरिक्षणात आढळले आहे.
सोलापूरला जोडून असलेल्या नान्नज अभयारण्य, हिरज, गंगेवाडी अशा लगतच्या माळरानामधील चित्र आता बदलत आहे. तुडंब भरलेले कुरुनुर धरण, हिप्परगा तलाव आदी जलाशय भरलेले आहेत. अनेक वर्षानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे हा बदल झाला आहे. माळरानांवर या वर्षीच्या पावसाने खुपच चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्वत्र गवत व त्यासोबत हिवाळी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. भोवत्या, शाही ससाणा, लग्गड ससाणा, क्षात्रबलाक असे अनेक पक्षी दाखल झाले आहेत. आतापर्यंत 287 पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद निरिक्षकांनी केली आहे. हा आकडा आणखी वाढला असला तर नोंदवण्याचे काम सुरू आहे.
मागील वर्षभरात सोलापूरमध्ये वन्य प्राण्यांची संख्या वाढू लागली आहे. लांडग्यांचे कळपांची संख्या वाढली आहे. कोल्ह्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे.
लांडगे, कोल्हे व काळवीटांचे कळप मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. लांडग्यांचे कळप शंभर ते दीडशे किमी अंतरापर्यंत भ्रमंती करीत असल्याचे निरीक्षणात आढळले आहे. कोल्ह्यांची संख्या उसाच्या क्षेत्रालगत दिसून येते. तसेच खोकडांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षी खऱ्याअर्थाने सोलापूरच जैवविविधतेसाठी सर्वोत्कृष्ट स्थिती पावसाने साधली गेली आहे. गवतासोबत अनेक प्रकारचे किटक, पक्षी व वन्य पशू पाहण्यास मिळत आहेत.
मेंढपाळांना रोखण्याची गरज
माळरानावर मेंढपाळांना रोखण्याची गरज आहे. माळरानांच्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी या प्रकारची धोरणे हाती घेणे आवश्यक बनले आहे. वन्य पशू, पक्ष्यासोबत विदेशी पक्ष्यांचा अधिवास देखील याच माळरानावर आधारित आहे.
- संतोष धाकपाडे, निसर्ग अभ्यासक
माळढोक पक्ष्यांची घट चिंताजनक
माळढोक पक्ष्यांची संख्या मात्र अगदीच कमी झाली हे चिंताजनक आहे. त्यांच्या संख्यावाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
- महादेव डोंगरे, निसर्ग अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.