esakal | इंदिरा गांधी पार्क स्टेडियममुळे सोलापूर शहराला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे वेध 
sakal

बोलून बातमी शोधा

cricket.jpg

सोलापूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान ऊभारले जात आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू पांडुरंग साळगावकर व लालचंद रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यापासून या प्रकल्पाला गती आली आहे. सोलापुर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी हा प्रकल्प उत्तम पध्दतीने उभारला जावा व सोलापूरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने व्हावेत हे ध्येय समोर ठेवून या प्रकल्पात सहभाग नोंदवला आहे. या मैदानाची आंतरराष्ट्रीय मानकानुसार सर्व कामाची गुणवत्ता असावी असा प्रयत्न केला गेला. 

इंदिरा गांधी पार्क स्टेडियममुळे सोलापूर शहराला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे वेध 

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडीयम या क्रिकेट मैदानाची स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत होणारी उभाऱणी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या मैदानाचे काम सत्तर टक्‍क्‍यापेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला या स्टेडियममुळे आणखी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने घेण्यासाठी मैदानाची भर पडणार आहे. येत्या दोन महिन्यानंतर या मैदानावर क्रिकेट सामने सुरू होणार आहेत. 

हेही वाचाः विजयादशमी निमित्त श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर पिवळ्या धमक झेंडूच्या फुलांनी गेले न्हाऊन 

सोलापूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान ऊभारले जात आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू पांडुरंग साळगावकर व लालचंद रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यापासून या प्रकल्पाला गती आली आहे. सोलापुर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी हा प्रकल्प उत्तम पध्दतीने उभारला जावा व सोलापूरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने व्हावेत हे ध्येय समोर ठेवून या प्रकल्पात सहभाग नोंदवला आहे. या मैदानाची आंतरराष्ट्रीय मानकानुसार सर्व कामाची गुणवत्ता असावी असा प्रयत्न केला गेला. 

हेही वाचाः शाळा सोडलेला मुलगा झाला मेजर तर दुसरा मॅनेजर, शिक्षिका वैशाली डोंबाळे यांनी दिला मदतीचा हात 

आता मैदानातील ड्रेनेजची यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच पॅव्हेलियन, ड्रेसिंग रुम, स्कोअरर कक्ष आदी अनेक कक्षांची उभारणी देखील झाली आहे. सर्वात महत्वाचा प्रश्‍न मैदानाची सज्जता हा होता. त्यासाठी विशेष प्रकारचे गवत लावण्यात आले आहे. मागील काही दिवसात मैदान हिरवेगार झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्फ विकेटवर खेळण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. एकाच वेळी आठ पिचेस उपलब्ध होणार असल्याने या ठिकाणी अधिक संख्येने आंतरराष्ट्रीय सामन्याचे व देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा देखील घेण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होणार आहे. 
या मैदानाची गुणवत्ता पाहता या मैदानावर पाच दिवसाचे सलग कसोटी सामने देखील खेळवले जाऊ शकतील या पध्दतीने मैदानाची गुणवत्ता ठेवली जात आहे. सोलापूर सारख्या शहराला जोडलेली आंध्रप्रदेश व कर्नाटकातील क्रिकेट क्षेत्रासाठी हे मैदान अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. बीसीसीआय दरवर्षी सर्वाधीक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत असते. त्यामुळे पार्क स्टेडियम मैदानात देखील होणारे सामने शहरातील क्रिकेटप्रेमीसाटी पर्वणी ठरणार आहे. तसेच सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजनाच्या यादीत पुढील काळात असणार आहे. या माध्यमातून सोलापूरचा नावलौकीक वाढण्यास मदत होणार आहे. याचा अप्रत्यक्ष लाभ पर्यटन व बाजारपेठेला देखील अप्रत्यक्ष चालना मिळणार आहे. सोलापूरच्या क्रिकेटच्या विकासाला देखील ही उपलब्धी महत्वाची ठरेल. 

कनेक्‍टीव्हीटी व सुविधांची उपलब्धता 
सोलापूर हे तीन राज्याच्या जोडलेले आहे. तसेच पूणे, मुंबई आदीची कनेक्‍टीव्हीटी पुरेशी आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे व विमान सेवा आदीसह हॉटेलिंग सुविधा भरपूर उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धासाठी सोलापूर हे उत्कृष्ट केंद्र ठरणार आहे. 

मैदानकामाला भेट 
दरम्यान, पार्क स्टेडीयम कामाला बीसीसीआयचे लेव्हल पंच अनिश सहस्त्रबुध्दे, अभिजित पाळंदे, निवड समितीचे माजी चेअरमन के.टी.पवार, चेअरमन उदय डोके, डीसीएचे ट्रेझरर प्रकाश भुतडा, सरचिटणीस चंद्रकांत रेंबर्सू, संजय मोरे, रणजीपटू नितीन देशमुख, वुमन कोच श्रीनिवास शिवाळ आदींनी भेट दिली. यावेळी मैदानाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

क्रिकेटला चालना मिळेल 
पार्क स्टेडियम मैदानाच्या उभारणीचे काम अत्यंत चांगल्या पध्दतीने सुरू आहे. पुढील काळात ही उभारणी परिसरातील क्रिकेट क्षेत्राला चालना देणारी ठरणार आहे 
- अनिश सहस्त्रबूध्दे , बीसीसीआय पंच  
 

go to top