सिंधू संस्कृतीने शांतता व मानवतेचा दिला संदेश ः इतिहास संशोधक डॉ.सत्यव्रत नूलकर 

sindhu sanskruti.jpg
sindhu sanskruti.jpg

सोलापूर ः सिंधू संस्कृतीच्या शोधाला शंभर वर्ष पूर्ण झाले असून या संस्कृतीचे शांतता आणि मानवतेचा दिलेला संदेश जगाने स्वीकारला आहे. म्हणूनच ही संस्कृती महान संस्कृती म्हणून सर्वमान्य झाली आहे असे मत पुरातत्त्व संशोधक डॉ. सत्यव्रत नूलकर यांनी येथे व्यक्त केले. 

पत्रकार नगरातील कर्मयोगी बंगल्यामध्ये प्राचीन सिंधू संस्कृतीच्या शोधाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष कार्यक्रम झाला. 
ते पुढे म्हणाले की, सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा डॉ. दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये उजेडात आणला. पंजाब मधील येथील हडप्पा येथे उत्खनन करण्यात आले. त्यानंतर मोहोंजोदडो चा शोध लागला. भारतीय आचार-विचारांशी संलग्न अशी ही संस्कृती होती. त्यामुळे आपण या महान संस्कृतीचे वारसदार आहोत याची प्रचिती सर्व भारतीयांना आली आहे, असे सांगितले. 
प्राचार्य शेख म्हणाले की, सिंध, पंजाबची मैदाने, बलुचिस्तान व अफगाणिस्तान या भागात सिंधू संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. या संस्कृतीमधील लोक धाडसी होते. व्यापाराच्या ा माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक संपर्क वाढवला. बुद्धिमत्तेच्या जोरावर जीवनातील अनेक क्षेत्रे त्यांनी पादाक्रांत केल्याचे दिसून येते. 
यावेळी प्रा. मस्के यांनी सांगितले की, सिंधू संस्कृतीमध्ये लोकांचा सर्वांगीण विकास झाला. विटांची उपयुक्त घरे, रस्ते, उत्कृष्ट गटार बांधणी, धान्याची कोठारे, मजुरांच्या चाळी आदी अनेक जीवनावश्‍यक संकल्पना या संस्कृतीतील लोकांनी कृतीमध्ये आल्या होत्या. डॉ. नभा काकडे यांनी सांगितले की, सिंधू संस्कृतीच्या दोन हजाराहून अधिक स्थळांचा आतापर्यंत शोध लागला आहे, भारत,पाकिस्तान, हरियाणा, राजस्थान, लोथल, मेरठ, अलामगिरपुर येथील स्थळांचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. या संस्कृतीला हेरिटेज दर्जा मिळाला आहे असे त्यांनी नमूद केले 
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्‍टर नुलकर यांच्यासह प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, राज्य हेरिटेज सदस्य डॉ. नभा काकडे, प्राध्यापक एम. एस. मस्के हे उपस्थित होते. यावेळी सिंधू संस्कृतीचे संशोधक डॉक्‍टर राखालदास बॅनर्जी व सर जॉन मार्शल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. संतोष मारकडवार यांनी केले. प्रा. दशरथ रसाळ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com