पुरग्रस्तांना जयहिंद फुड बॅंकेने दिला मदतीचा हात 

jayhind1 .jpg
jayhind1 .jpg
Updated on

सोलापूरः जयहिंद फुडबॅंक सोलापुर च्या माध्यमातुन दर वर्षी वेगवेगळे समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात पण यंदा च्या वर्षी कोरोना चालू असतानाच पावसाचा जोर अचानक वाढला आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महापुर आला आणि रौद्र रूप धारण केले आहे. मानवी जिवन विस्कळीत झालेला आहे, अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला असुन अनेक लोकांचे हाल होत आहेत. 

अशा वेळी सोलापूर जवळ विजयपुर रोड वर असणाऱ्या हत्तुर गाव व हायवे पुर्ण पणे पाण्याने व्यापला असुन अनेक ठिक ठिकाणी सामान वाहतुक करणारे ट्रक अडकून आहेत त्यांना जेवण मिळालेले नाही अशी माहिती पोलिस कर्मचारी अमरसिंग शिवसिंगवाले यांनी जयहिंद फुडबॅंकेचे संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी यांना दिली. अडकलेल्या लोकांची होणारी उपास मार पाहता जयहिंद फुडबॅंक च्या माध्यमातुन चालक व वाहक यांना जेवण वाटप करुन होणारी उपासमार थांबवण्याचा प्रयत्न या जागतिक अन्न दिनी जयहिंद फुडबॅंक करण्यात आला. 

या नैसर्गिक आपत्तीच्या काळात दरदिवशी जयहिंद फुडबॅंकेच्या माध्यमातुन जेवण देण्यात येणार आहे. ज्यांना मदत हवी आहे त्यांनी संपर्क करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात धान्य व साहित्य देऊन सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी यांनी केले. गरजुंनी मो.क्र. 9665808571 व मो.क्रं. 8411902020 यावर संपर्क साधावा. आज झालेल्या उपक्रमात सुरेश तमशेट्टी, राजश्री तमशेट्टी, विनय गांगजी, सुधिर तमशेट्टी, शुभम बल्ला, सौरभ करकमकर, विशाल शिकतोलू, हत्तुरचे रहिवाशी प्रशांत सलगरे, श्रीशैल हिरेमठ स्वामी, बाप्पा वाले, अलोक तंबाके, सतिश तमशेट्टी हे उपस्थित होते,  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com