बेकायदा विक्रीच्या उद्देशाने चोरून आणलेला जेसीबी जप्त 

राजकुमार शहा
Thursday, 22 October 2020

या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. सिद्धेश्‍वर वसंत वगरे रा नान्नज ता उत्तर सोलापूर व भगवान बापु यलगुंडे रा पाकणी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना अधिक तपासासाठी उमरगा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली.

मोहोळ(सोलापूर)ः बेकायदा विक्रीच्या उद्देशाने बाहेरील जिल्ह्यातून चोरून आणलेला पस्तीस लाख रुपयाचा जेसीबी कामती पोलिसांनी जप्त केल्याची घटना कुरूल ता मोहोळ येथे बुधवारी घडली. 

हेही वाचाः सिध्देश्‍वरची चिमनी पाडली तरी उडान अशक्‍य, रनवे वाढविण्यासाठी जागा नाही 

या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. सिद्धेश्‍वर वसंत वगरे रा नान्नज ता उत्तर सोलापूर व भगवान बापु यलगुंडे रा पाकणी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना अधिक तपासासाठी उमरगा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली. 

हेही वाचाः सांगोला तालुक्‍यात शेततळ्यात बुडून चुलत बहिणींचा मृत्यू 

या संदर्भात कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,वरील दोघांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथून सुमारे दोन ते तीन महिन्यापूर्वी खरेदी केलेल्या जेसीबी ची चोरी केली. याबाबत उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 367/ 2020 नुसार जेसीबी च्या मालकाने फिर्याद दिली होती. गुप्त बातमीदारा मार्फत सदरचा जेसीबी हा कामती ते मोहोळ रस्त्यावर असल्याची माहिती कामती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी जेसीबी आढळून आला, तो पोलिसांनी जप्त केला. 
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, हवालदार माने, पोलीस नाईक काळे, पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी केली. सदरची ची टोळी ही आंतरराज्य गुन्हेगारी करणारी असून, तपासात अनेक चोरीची वाहने निष्पन्न होण्याची शक्‍यता असल्याचेही सहाय्यक पोलीस निरीक्षक उंदरे यांनी सांगितले. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JCB stolen for illegal sale confiscated