सोलापुरातील लॅब ! 110 जणांचे अहवाल निगेटिव्ह 

corona.
corona.

सोलापूर : कोरोनाचा विळखा राज्यभरात वाढू लागल्याने राज्य सरकारने सोलापुरात स्त्राव नमुने तपासणी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला. मागील 11 दिवसांत सोलापुरातील लॅबमध्ये तब्बल 110 संशयीतांच्या स्त्राव नमुन्याची पडताळणी करण्यात आली. एकाही व्यक्‍तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले नाहीत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. 


फेब्रुवारी व मार्चच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर शहर-जिल्ह्यात चीन, दुबईसह अन्य देशांमधून प्रवास करुन आलेल्या रुग्णांची त्याचवेळी पडताळणी करण्यात आली. त्यांना 14 दिवस होम क्‍वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. डॉक्‍टरही सतत त्यांच्या संपर्कात होते, मात्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडला आणि सर्वांचीच चिंता वाढली. परराज्यातून, परजिल्ह्यातून आणि परदेशातून आलेल्या व्यक्‍तींची ट्रॅव्हल हिस्ट्री पडताळून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यासाठी आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था करण्यात आली. सोलापूर जिल्ह्याशेजारील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाही सोलापुरात अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. दरम्यान, सोलापुरात सुरु करण्यात आलेल्या स्त्राव नमुने तपासणी लॅबमध्ये तबलिकी, निजामुद्दीनवरुन आलेल्यांसह अन्य 110 संशयीत व्यक्‍तींची तपासणी पार पडली. जमेची बाब म्हणजे त्यापैकी एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळलेला नाही. 


नागरिकांच्या खबरदारीमुळे सोलापूर कोरोनापासून दूर 
शासनाच्या माध्यमातून सोलापुरसाठी स्त्राव नमुने तपासणीची स्वतंत्र लॅब मिळाली आहे. लॅब सुरु झाल्यापासून आतापर्यंत 110 संशयीत व्यक्‍तींच्या स्त्राव नमुन्यांची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी सर्वच रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापुकरांनी घेतलेल्या खबरदारीमुळे जिल्हा कोरोनापासून दूर आहे. 
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर 


सात तासांत मिळतो रिपोर्ट 
कोरोना आहे की नाही, हे पडताळण्यासाठी संशयीतांच्या घशातील लाळेचा नमुना व नाकातील स्त्रावाच्या नमुन्यांची पडताळणी केली जाते. सोलापुरात लॅब सुरु होण्यापूर्वी संशयीतांचे नमुने पुण्याला पाठवावे लागत होते. त्यांचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत मिळत होता. मात्र, आता सोलापुरात लॅब सुरु झाल्याने सात तासांत जागेवरच रिपोर्ट उपलब्ध होऊ लागल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोयीचे झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com