थर्मल स्कॅनर मिळेना : डॉक्‍टरांकडूनच एन-95 मास्कची मागणी 

तात्या लांडगे
मंगळवार, 24 मार्च 2020

सेवानिवृत्त डॉक्‍टरांकडून मागितली तात्पुरती सेवा 
महापालिका असो की ग्रामीण भागातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्‍त पदे आहेत. या पार्श्‍वभूमीवर मनुष्यबळाची भरती करणे कठीण असल्याने सेवानिवृत्त झालेल्या डॉक्‍टरांकडून तात्पुरत्या स्वरुपात सेवा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महापालिकेसह अन्य विभागांनी केल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सोलापूर : कोरोनाने आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाय पसरायला सुरवात केली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सोलापुरातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांसह महापालिकेच्या आरोग्य विभागाने संशयितांची तपासणी व त्यांच्या उपचारासाठी राज्य सरकारकडे एन-95 मास्कसह विविध यंत्रे व वस्तूंची मागणी नोंदवली आहे. तसेच कुशल मनुष्यबळही उपलब्ध नसल्याने सेवानिवृत्त झालेल्यांकडून तात्पुरत्या स्वरुपात सेवा मिळावी, अशीही मागणी केली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

हेही नक्‍की वाचा : भुजबळ कडाडले ! चढ्या दराने वस्तू विकल्यास सात वर्षांची शिक्षा 

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अकलूज, करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आणि बार्शी, करकंब, माळशिरस, वडाळा व अक्‍कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचा ताप तपासणीसाठी प्रत्येकी दोन थर्मल स्कॅनर मशिन मिळावेत. तसेच महापालिकेने 20 हजार एन-95 मास्क तर साधे मास्क 50 हजार द्यावेत, अशी मागणी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली आहे. पर्सनल प्रोटेक्‍ट कीट 100 द्यावेत आणि सोडीयम हायक्‍लोफ्लोराईड अडीच हजार लिटर द्यावे, अशीही मागणी नोंदविली आहे. रुग्णांच्या ह्दयाचे ठोके मोजण्यासाठी मॉनिटर व पल्स्‌ ऑक्‍सिमिटर द्यावेत, असेही स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व महापालिकेच्या आरोग्य विभागाला साहित्य मिळालेले नाही. 

हेही नक्‍की वाचा : मोठी बातमी ! रेल्वेला बसणार 11 हजार कोटींचा फटका 

सेवानिवृत्त डॉक्‍टरांकडून मागितली तात्पुरती सेवा 
महापालिका असो की ग्रामीण भागातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्‍त पदे आहेत. या पार्श्‍वभूमीवर मनुष्यबळाची भरती करणे कठीण असल्याने सेवानिवृत्त झालेल्या डॉक्‍टरांकडून तात्पुरत्या स्वरुपात सेवा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महापालिकेसह अन्य विभागांनी केल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : रोजगार हिरावला ! बचत गटांच्या 10 लाख महिलांचा रोजगार हिरावला 

सोलापुरातील आरोग्य विभागाची मागणी 

  • नेम्युलायझर (ऑक्‍सिजन) तर मॉनिटर व पल्स ऑक्‍सिमिटर द्यावेत 
  • रुग्णांच्या शरिराचे टेम्प्रेचर मोजण्याकरिता द्यावेत थर्मल स्कॅनर मशिनस्‌ 
  • उपचार करणाऱ्या डॉक्‍टरासांठी द्यावेत 20 हजार एन-95 मास्क 
  • पर्सनल प्रोटेक्‍ट किट 100 तर साधे मास्क 50 हजार उपलब्ध करुन द्यावेत 
  • सोडियम हाइड्रॉक्‍साइडचे पाच लिटरचे 500 डबे मिळावेत 
  • शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्‍टरांची पदे रिक्‍त असल्याने सेवानिवृत्त डॉक्‍टरांकडून मिळावी तात्पुरती सेवा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack off thermal scanner Doctors demand N-95mas mask