भाषा मनाला इतरांशी जोडण्याचे काम करते ; उध्दव महाजन बिस्मिल

प्रकाश सनपूरकर
Tuesday, 29 September 2020

हिंदी-उर्दू कौमी एकता मंच सोलापूर व खादिमाने उर्दू फोरम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवसाच्या निमित्तानी हिंदी हैं हम, वतन है हिंदुस्थान हमारा या विषयावर एका वेबिनारमध्ये प्रा. उध्दव महाजन बिस्मिल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यस्थानी हिंदी-कौमी एकता मंच सोलापूरचे अध्यक्ष डॉ. बंडोपंत पाटील होते. 

सोलापूरः कुठली ही भाषा असू दे, ती मनाला जोडण्याचे काम करते. दोन मने सांधण्याचे काम भाषा करते. भाषा ही कुणा एका धर्म, समुदाय, प्रांत यांची विरासत नसते असे उद्गार प्रख्यात हिंदी उर्दू कवी साहित्यिक उध्दव महाजन बिस्मिल (पुणे) यांनी काढले. 

हेही वाचाः करमाळा तालुक्‍यातील पोफळज येथील माळढोक अभयारण्यात झाडांची कत्तल 

हिंदी-उर्दू कौमी एकता मंच सोलापूर व खादिमाने उर्दू फोरम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवसाच्या निमित्तानी हिंदी हैं हम, वतन है हिंदुस्थान हमारा या विषयावर एका वेबिनारमध्ये प्रा. उध्दव महाजन बिस्मिल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यस्थानी हिंदी-कौमी एकता मंच सोलापूरचे अध्यक्ष डॉ. बंडोपंत पाटील होते. 

हेही वाचाः राठोड गुरुजी करतात ऑनलाइन शिक्षणात गुगल मीटचा वापर 

उध्दव महाजन बिस्मिल म्हणाले, इक्‍बाल मूलत: राष्ट्रीय कवी होते. त्यांच्या शायरीत देशभक्तीने प्रेरित अनेक रचना आहेत. इक्‍बाल यांच्या शायरीत गौतम, राम, नानक, चिश्‍ती, रामानंद यांचा उल्लेख दिसतो. नया शिवाला, हिमालया, तराना हिंदी मार्फत त्यांनी राष्ट्रीय एकात्मताचे दर्शन घडविले. आजही सारे जहांसे अच्छा हिंदुस्थां हमारा या गीतेला तोड नाही. मजहब नही सिखाता आपस में बैर रखना या वाक्‍यात सर्वधर्म समभाव आहे असे नमूद केले. अध्यक्षीय समारोप डॉ. बंडोपंत पाटील यांनी केले. 
मंचचे सचिव विकार अहमद शेख यांनी सर्वाचा परिचय करून दिला. या वेळी प्रख्यात कवी व लेखक नजीर फतेहपुरी (पुणे), कवी रफीक काझी (पुणे), हाजी अन्सर (भुसावल), इश्‍तियाक अहमद (कुवेत) यांच्यासह खादिमाने उर्दू फोरमचे उपाध्यक्ष अय्युब नल्लामंदू, सहसचिव महेमूद नवाज, समन्वक रफीक खान, संचालक इक्‍बाल बागबान, अ. मन्नान शेख, मजहर अल्लोळी यांचासह भाषाप्रेमी उपस्थित होते. शेवटी डॉ. म. शफी चोबदार यांनी आभार मानले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Language serves to connect the mind with others; Uddhav Mahajan Bismil