जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया : जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर 

collector mohim.jpg
collector mohim.jpg

द.सोलापूर (सोलापूर) : कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनासोबत लोकसहभाग महत्वाचा आहे. नागरिकांनी कोणताही आजार लपवू नये. वेळेत उपचार घेतले तर कोरोना बरा होतो. सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज मुळेगाव ता.दक्षिण सोलापूर येथे केले. 

जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे भेट देऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या सर्वेक्षणाची माहिती घेतली. यावेळी सरपंच ब्रह्मनाथ पाटील, तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड, परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

श्री. शंभरकर यांनी आज मोहिमेच्या शुभारंभानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षण कसे चालते याची माहिती घेऊन आरोग्य पथकाला विविध सूचना केल्या. त्यांनी पाच ते सहा घरांचे सर्वेक्षण कसे चालते? पथक त्यांना काय माहिती देते? आणखी काय माहिती द्यावी, याचे बारकाईने निरीक्षण केले. आरोग्य पथकाला साहित्याचे वाटप झाले आहे का? यावेळी त्यांनी कुटुंब प्रमुखांशी बातचीत केली. लहान मुलांना बाहेर जास्त पाठवू नका, त्यांची काळजी घ्या. मास्कचा वापर करा, हात साबणाने धुवा, गरज असेल तरच घराबाहेर जा अशा सूचना दिल्या. 
येथील सुरेखा वायकर यांच्या घरी श्री. शंभरकर यांनी भेट देऊन त्यांना जागरूक राहण्यास सांगितले. दक्षता काय घ्यावी, स्वत:ला किंवा कुटुंबातील सदस्यांना त्रास जाणवल्यास तत्काळ दवाखान्यात जावे असे सांगितले. 
सर्वेक्षण करताना ज्या घरात कुटुंबातील अन्य सदस्य नसतील, तिथे पुन्हा सर्वेक्षण करा, त्यांची तपासणी करा, ऑक्‍सिजन पातळी, तापमान घेण्याच्या सूचनाही त्यांनी पथकाला केल्या. 
जिल्ह्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम महत्वाची असून लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था सर्वांनी यामध्ये सामील होण्याचे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री. पाटील यांनी रस्ते, पाणी या समस्येबाबत माहिती देऊन जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांना निवेदन दिले. 
दरम्यान, कंदलगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या हस्ते माझे कुटुंब-माझी जबाबदारी हिमेस प्रारंभ केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समिती सभापती सोनाली कडते, अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, सरपंच रावसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक थिटे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे उपस्थित होते  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com