"लोकमंगल'च्या नावाने स्वमंगल साधू नका; माजी सहकारमंत्र्यांवर कोणी केली टीका? वाचा 

Agitation
Agitation

कुसूर (सोलापूर) : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यावर आठ महिन्यांपासून थकित ऊस बिलासाठी महाराष्ट्र विकास आघाडी व क्रांतिवीर किसान सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. क्रांतिवीर किसान सेनेचे शेखर बंगाळे, करण गडदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी करण गडदे, विंचूरचे सचिन साबळे, नरहरी वारे, महादेव मुक्काणे, रमेश बबलेश्वर, नागनाथ जंगलगी, देवण्णा पुजारी, रेवप्पा मकणापुरे (बरूर), मल्लिकार्जुन भांजे (अरळी) यांनी कारखाना प्रशासनावर टीका केली. 

या वेळी सचिन साबळे म्हणाले, लोकमंगल कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना बिल मिळाले नाही. येथे लोकमंगल नव्हे तर स्वमंगल होत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण थकित ऊसबिल मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. बोळकवठेचे माजी सरपंच राम गायकवाड यांनी ऊस बिल थकवल्याबद्दल माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, दक्षिण सोलापूरच्या गरीब शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या उसाचे बिल तुम्ही वेळेवर का देत नाही? बिल विचारणाऱ्या शेतकऱ्यांनाच उलट दमदाटी केली जाते. देशात लोकशाही आहे मोगलाई नाही. लोकशाही मार्गानेच आम्ही आंदोलन करत आहोत. लोकमंगलच्या नावाने स्वमंगल साधू नका. 

महादेव मुक्काणे म्हणाले, गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्या वेळी जुलैअखेर सर्वांचे बिल देण्याचे कबूल करण्यात आले होते. पण दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही. इतके कसे खोटे वागता? शेतकऱ्यांच्या घामाचे हक्काचे पैसे तुम्ही का देत नाही? 

यावेळी करण गडदे, विंचूरचे सचिन साबळे, नरहरी वारे, महादेव मुक्काणे, रमेश बबलेश्वर, नागनाथ जंगलगी, देवण्णा पुजारी, रेवप्पा मकणापुरे, मल्लिकार्जुन भांजे यांनी कारखाना प्रशासनावर टीका केली. आंदोलनस्थळी मल्लिनाथ बबलेश्वर, सुनील भरले, मुकेश व्हनकोरे, शरणप्पा हत्ताळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन थिटे, पीएसआय गणेश पिंगूवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com