बॅंक खासगीकरणाविरोधात बॅंक कर्मचारी व अधिकारी संघटनेचे आंदोलन

प्रकाश सनपूरकर
Sunday, 13 September 2020

केंद्र सरकार शासकीय बॅंकांचे खासगीकरण करण्याचा डाव आखत आहे. त्याला विरोध म्हणून राष्ट्रीय अभिमान असलेल्या राष्ट्रीयकृत बॅंकेच्या रक्षणाची व खाजगीकरण्याच्या विरोधात जनजागृती करण्याची शपथ घेण्यात आली. 

सोलापूरः ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंक ऑफिसर्स असोसिएशन तर्फे बॅंक खासगीकरण विरोधी अभियानाची सुरुवात रविवारी (ता.13) करण्यात आली. या अभियानाची सुरवात बॅंक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा या कार्यालय परिसरात करण्यात आली. 

हेही वाचाः सांगोला तालुक्‍यातील किंगमेकर सुभाष पाटील 

केंद्र सरकार शासकीय बॅंकांचे खासगीकरण करण्याचा डाव आखत आहे. त्याला विरोध म्हणून राष्ट्रीय अभिमान असलेल्या राष्ट्रीयकृत बॅंकेच्या रक्षणाची व खाजगीकरण्याच्या विरोधात जनजागृती करण्याची शपथ घेण्यात आली. 

हेही वाचाः बार्शी टेक्‍सटाईल मिल सहा महिन्यापासून बंद ; कामगारांवर उपासमारीची वेळ 

आजपासुन खासगीकरनाच्या विरोधात नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी आदींच्या स्वाक्षऱ्यांची मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 लाख लोकांच्या सह्याचे निवेदन पंतप्रधान व अर्थमंत्री यांना देण्याचा निर्णय झाला. त्यावर देखील सरकारने बॅंकेच्या खासगीकरण न थांबवल्यास जन आंदोलन करावे लागेल. या आंदोलनाच्या वेळी कामगार कृती समितीचे निमंत्रक अशोक इंदापुरे, महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, महाराष्ट्र राज्य परीचारिका कर्मचारी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष मनीषा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच बरोबर बॅंक अधिकारी संघटनेचे प्रसाद आतनुरकर, नवीन कुमार, बॅंक कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक सुहास मार्डीकर, बॅंक कर्मचारी संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी अतुल कुलकर्णी, संतोष चिकटयाळकर, सचिन काळे यांची उपस्थिती होती. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यपरिचारिका संघटनचे अध्यक्ष आशा वाघमोडे, सचिव संध्या गावडे, कोषाध्यक्ष आशा माने, पाटबंधारे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मरिअप्पा फंदेलल्लु, चतुर्थीश्रेणी कर्मचारी मध्यवती संघटनेचे सल्लागार चंद्रकांत चलवादी , पंकज जाधव, सिविल हॉस्पिटल चे अमर रिझोरा, राज्य कामगार रुग्णालयाचे अध्यक्ष महेश बनसोडे, रवि रावळे, तसेच दत्ता चव्हाण, मल्लेश कारमपुरी उपस्थित होते.  
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement of Bank Employees and Officers Association against Bank Privatization