मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढा लढताना शासनाने कुचराईपणा करू नये

MP Chhapati Sambhaji Raje said that the state government should not waste time fighting the reservation battleMP Chhapati Sambhaji Raje said that the state government should not waste time fighting the reservation battle of tof the Maratha community 2.jpg
MP Chhapati Sambhaji Raje said that the state government should not waste time fighting the reservation battleMP Chhapati Sambhaji Raje said that the state government should not waste time fighting the reservation battle of tof the Maratha community 2.jpg

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढताना राज्य शासनाने कुचराई पणा करू नये, समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आरक्षण मिळवण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मागील सरकारने आरक्षण दिले होते, पण हे आरक्षण सर्वोच्च न्यायालय टिकले नाही. आता इथून पुढे तरी सरकारने न्यायालयीन लढ्यासाठी काळजीपूर्वक पावले उचलावीत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करमाळ्यात पत्रकार परिषदेत केली.

करमाळा येथे पञकार संघाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पञकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, न्यायालयीन लढ्यासाठी सत्ताधारी व विरोधक यांनी एकत्रित बसून चांगल्या पद्धतीची तयारी करून जास्त तयारीचे वकिलांची फौज न्यायालयात उभी केली पाहिजे. आरक्षणाचे राजकारण होता कामा नये, सत्ताधारी व विरोधक दोघांनी एकत्रित बसून याचा अभ्यास करून न्यायालयीन लढाई लढली तर नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळेल.

समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कामकाजावर आम्ही समाधानी असलो तरी मराठा समाजाचे आरक्षण अद्याप मिळत नाही. आता मराठा समाजाचा संयम सुटत आलेला आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधक या दोघांनी मिळून हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे. समाजातील ओबीसी आर्थिक दृष्ट्या मागास असेल आणि सूचित जाती जमाती असतील. या सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. 

समाजातील आरक्षणामुळे आपले महापुरुष प्रत्येक जातीने वाटून घेतले आहेत का? या प्रश्नावर बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, जय भवानी जय शिवाजी की जय भीम अशा घोषणा देऊन तुम्हाला शाहू-फुले-आंबेडकर कळणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला त्यांचा खरा इतिहास वाचावा लागेल आणि हा इतिहास वाचला आणि आत्मसात केला तर खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशात सामाजिक शांतता निर्माण होणार आहे.

आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देताना अठरापगड बारा बलुतेदार जाती मागासवर्गीय सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. त्याचबरोबर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिले आणि छत्रपती शाहू महाराजांना आदर्श मानून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची मांडणी केली. आता पत्रकारांनी छत्रपती शाहू महाराजांचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वारंवार आपल्या लेखणीतून वाचकांपुढे नेला तर निश्चितच समाजात प्रगल्भता येऊन एकमेकाबद्दल प्रेम वाढेल.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com