esakal | सकाळ ब्रेकिंग : एमएपीएसीसह विद्यापीठांच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर 
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC-1.png
  • कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाउनचा कालावधीही वाढण्याची शक्‍यता 
  • एमपीएससीकडून फेरनियोजनाचे नियोजन : दहावीच्या परीक्षेचाही निर्णय नाही 
  • लॉकडाउनचा कालावधी वाढत असल्याने विद्यापीठाने बंद केले परीक्षेचे नियोजन 
  • आता शासन स्तरावरुन पुढील आदेश आल्यानंतरच परीक्षा : विद्यापीठाचे स्पष्टीकरण 

सकाळ ब्रेकिंग : एमएपीएसीसह विद्यापीठांच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना या विषाणूचे संक्रमण खंडीत करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालावधीत 31 मार्चवरुन 14 एप्रिलपर्यंत वाढविला आहे. दरम्यान, रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यात आणखी बदल होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आता एमपीएससीने राज्य सेवेची परीक्षा तर विद्यापीठांनी पदवी व पदवीत्तोर विद्यार्थ्यांची परीक्षा पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही नक्‍की वाचा : काळजी घ्या : कोरोनाबाधितांची संख्या दोनशेहून अधिक 

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता दोनशेहून अधिक झाली असून देशात एक हजारांहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आहेत. लॉकडाउननंतरही देशातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने जीवनावश्‍यक वस्तूची दुकाने (आस्थापना) वगळता सर्व शासकीय, खासगी कार्यालये, व्यवसाय, उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला. तर विद्यापीठासह दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर एमपीएससीतर्फे 26 एप्रिलला राज्य सेवेची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, आता या सर्व परीक्षा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीचे सचिव राज्य सेवा परीक्षेची पुढील नियोजन जाहीर करतील, अशी माहिती अव्वर सचिव राजेंद्र वाघ यांनी सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : लॉकडाउन अनिश्‍चित : पुढील आदेश येईपर्यंत लालपरी जागेवरच 


पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा नाहीत 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित केला, परंतु त्यात पुन्हा 14 एप्रिलपर्यंत वाढ केली. दरम्यान, 1 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने सुरु केले होते. मात्र, लॉकडाउनचा कालावधी वाढेल म्हणून आता पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. 
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

हेही नक्‍की वाचा : गुड न्यूज : यवतमाळचे तिन्ही रुग्ण झाले ठणठणीत 

ठळक बाबी... 

  • विद्यापीठाने बंद केले परीक्षांचे नियोजन : आता पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा रद्द 
  • एमपीएससीने राज्य सेवा परीक्षेच्या नियोजनात केला बदल 
  • दहावीच्या परीक्षेचा निर्णय नाहीच : 31 मार्चनंतर निर्णयाची अपेक्षा 
  • लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची शक्‍यता : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये होतेय वाढ 
  • शासकीय महाभरतीचे नियोजन रद्द : एप्रिलनंतर एजन्सी नियुक्‍तीच्या प्रक्रियेला होणार सुरवात 
go to top