घरफोडीत नाव घेतल्यावरुन मित्राचा खून ! धारधार शस्त्राने छातीत वार, डोक्‍यात दगड अन्‌ गळा आवळला 

1Crime_6_98.jpg
1Crime_6_98.jpg

सोलापूर : चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना आपले नाव सांगितल्याच्या कारणावरुन अमोल उर्फ बबल्या राजेंद्र नरळे (वय 30, रा. बल्लार चाळ, दमाणी नगर) याने त्याचा सहकारी शैलेश गणपत कोकाटे याचा खून केला. सोमवारी (ता. 21) मध्यरात्री ही घटना घडली.शैलेश गणपत कोकाटे याचा दारु पाजून धारधार शस्त्राने वार करुन गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक बालाजी भागवत वसेकर यांनी बबल्याविरुध्द फिर्याद दिली आहे.

शहरातील फौजदार चावडी हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यात काही दिवसांपूर्वी शैलेश गणपत कोकाटे (वय 30) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी शैलेशने अमोल उर्फ बबल्या राजेंद्र नरळे याचे नाव घेतले होते. त्यानंतर बबल्या हा शैलेशवर चिडून होता. सोमवारी (ता. 21) बबल्याने शैलेशला त्याच्या गाडीवर बसवून नेले. तत्पूर्वी, शैलेशला दारुही पाजली होती. त्यानंतर बबल्याने शैलेशच्या छातीत धारधार शस्त्राने छातीत वार केला. ही घटना जुनी मिल कपांउंड परिसरात करजगी यांच्या अपार्टमेंटचे काम सुरु आहे, त्याठिकाणी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे हे त्याठिकाणी पोहचले. त्यानंतर उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलिस आयुक्‍त कमलाकर ताकवले, अभय डोंगरे यांनी घटनास्थळी भेट दिली. बबल्याने सुरवातीला छातीच्या डाव्या बाजूला धारधार शस्त्राने वार केला. त्यानंतर डोक्‍यात दगड घातला. जमखी झाल्यानंतर त्याचा गळा आवळला, अशी माहिती श्री. साळुंखे यांनी दिली. प्रत्यक्षदर्शी साक्षिदारासह घटनास्थळावरील माहितीवरुन हा खून बबल्यानेच केल्याचे उघड झाले आहे. बबल्या आता पसार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याचेही साळुंखे म्हणाले.

गुन्हेगारीच्या इतर बातम्या 

विडी घरकुलात पावणेदोन लाखांची चोरी 
सोलापूर : साईबाबा चौकातील हनुमान मंदिरामागे विठ्ठल करबसू जाधव यांच्या गाळ्यात जयश्री निवृत्ती काटे (रा. भारत नगर, विडी घरकूल) यांचे कपड्याचे दुकान आहे. सोमवारी (ता. 21) रात्री दहा वाजता दुकान बंद करुन जयश्री या घरी निघून गेल्या. त्यानंतर रात्रीत चोरट्याने दुकान फोडून दुकानातील एक लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी काटे यांनी सलगर वस्ती पोलिसांत तक्रार दिली आहे. तत्पूर्वी, चोरट्याने दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातून विविध रंगाच्या साड्या, लहान मुलांचे कपडे, अस्तर, बेनटेक्‍सचे दागिने, लेडीज होजिअरी असे साहित्य चोरुन नेल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


नगरसेवक किसन जाधवचा अटकपूर्व नामंजूर 
सोलापूर : साडी विक्री व्यवसायासाठी 50 हजार रुपये व्याजाने देऊन त्या पैशासाठी प्रवण सिद्राम जाधव यास मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक किसन जाधवसह चौघांविरुध्द सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जाधव याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, जाधव हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला असून साक्षीदार व फिर्यादीवर दबाव आणू शकतो, असा युक्‍तीवाद जिल्हा सरकारी अभियोक्‍ता श्री. व्हटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने नगरसेवक जाधव याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रेम नागेश गायकवाड, विकी चंद्रकांत जाधव, प्रभाकर गायकवाड हेही फरार आहेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. भूसनूर करीत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com