सोलापुर शहरात दुसऱ्या दिवशी बाजारात बेफाम गर्दीने झाला ट्रॅफिक जाम 

traffic jam.jpg
traffic jam.jpg

सोलापूरः शहरात लॉकडाउन कालावधी सुरु होण्यापूर्वी सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांनी शहरातील बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टन्स धाब्यावर बसवून मुक्त खरेदी केली. रस्त्यावर आलेली वाहने व पायी चालणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळे विजापूर वेस ते माणिक चौक या भागात काही काळ ट्रॅफीक जाम झाली होती. श्रावण महिना व बारावी निकालाने बाजारातील गर्दीत भर पडली. 


आज सकाळपासून बाजारातील रस्ते गर्दीने फुल्ल झाले होते. किराणासोबत इतर सर्व प्रकारच्या खरेदीसाठी वाहने घेऊन नागरिक रस्त्यावर आले होते. गरजेच्या वस्तुसोबत झेरॉक्‍स काढणे, शोभेच्या वस्तुची खरेदी, फुले, नारळ, बरण्या, ब्रेड, चिवडा या सह कमी गरजेच्या किंवा नंतर खरेदी करता येणाऱ्या वस्तुंची खरेदी देखील सुरु होती. महिला व पुरूष मोठ्या संख्येने शहरातील सर्वच रस्त्यावर वाहने घेऊन दाखल झाले होते. लॉकडाउन पुर्वीचा शेवटचा दिवस म्हणून पोलिसांनी देखील खरेदीसाठी परवानगी दिली होती. सकाळी वाहने व पायी चालणारे नागरिक अचानक मोठ्या संख्येने जमा झाल्याने विजापूर वेस ते माणिक चौक या रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले होते. आजोबा गणपती मंदिर भागात वाहनांची गर्दी खुपच वाढली होती. कोणतीच वाहने रस्त्यावर पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत रस्ता मोकळा करून दिला. 

लॉकडाउनच्या काळातच श्रावण महिना सुरू होत आहे. नागपंचमीचा सण देखील याच कालावधीत असणार आहे. त्यासाठी देखील महिला साहित्याची खरेदी करत होत्या. फुले, फळे, विड्याची पाने आदी अनेक पुजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची महिलांनी खरेदी केली. दिवसभर रिक्षाचालक मोठ्या संख्येने नागरिकांना घेऊन येजा करीत होते. त्यातच बारावीचा निकाल लागल्याने पेढ्यांची खरेदी सुद्धा जोरात सुरू होती. पण, अनेक दुकानातील पेढे संपल्याने ग्राहकांची निराशा झाली. मिठाईच्या दुकानात ग्राहकांनी गर्दी केली होती. व्यापाऱ्यांनी देखील लॉकडाउन होणार असल्याने दुकानात माल साठवण्यासाठी रस्त्यावर वाहने लावली होती. नागरिकांना लॉकडाउनच्या काळात ताजा भाजीपाला मिळावा म्हणून आज दिवसभर शहरातील सर्वच भाजीमंडी उघडलेल्या होत्या. शहराच्या विविध भागातील भाजीमंडीमध्ये सकाळपासून लोक भाजी खरेदी करत होते. सायंकाळी उशीरापर्यंत बाजारात आलेले नागरिक अनेक प्रकारच्या खरेदीमध्ये व्यस्त होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com