सोलापुरात आज ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा 

chess tournament
chess tournament

सोलापूर : सोलापूर चेस ऍकॅडमी व सुदीप मित्रपरिवार यांच्यातर्फे उद्या (सोमवार) इलो 1500 मानांकनखालील तसेच मंगळवारी (ता. 2) इलो 2000 मानांकनखालील ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेचे दुपारी दोन वाजता आयोजन केले आहे. 

स्पर्धा दुपारी दोन वाजता 
महाराष्ट्र कॉंग्रेस सेवादल युथ ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा दुपारी दोन वाजता लीचेस.ओआरजी https://lichess.org/ या संकेतस्थळावर होणार असून खेळाडू गुगलच्या प्ले स्टोअरमधील लीचेस ऍप डाउनलोड करून मोबाईलवर ही स्पर्धा खेळू शकतात. 

तांत्रिक बाबींसाठी तज्ज्ञ 
स्पर्धा विविध गटांत स्वीस लीग नियमानुसार होणार असून विजेत्या खेळाडूंना चार हजार 840 रुपयांची रोख तथा उत्तेजनार्थ पारितोषिके ऑनलाइन खात्यात जमा केली जाणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी असणार आहे. स्पर्धेसाठी तांत्रिक बाबींसाठी तज्ज्ञ म्हणून रत्नागिरीचे आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी व कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले काम पाहणार आहेत. 

लॉकडाउनमध्ये खेळाडूंना संधी 
इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी प्रमुख पंच उदय वगरे (मो. 8888045344) व प्रशांत पिसे (मो. 9156815963) यांच्याकडे संपर्क साधावा, असे ऍकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर व सुदीप चाकोते यांनी केले आहे. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा व स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सोलापूर डिस्ट्रिक्‍ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, सचिव सुमुख गायकवाड, अतुल कुलकर्णी, रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, संतोष पाटील, उमेश कमलापूरकर, डॉ. अनिल कांबळे, बी. भोसेकर, गणेश मस्कले, निहार कुलकर्णी, विजय पंगुडवाले, जयश्री कोंडा, रोहिणी तुम्मा आदींनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com