esakal | विरोधी पक्ष नेते फडणवीस सोमवार आणि मंगळवार पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर

बोलून बातमी शोधा

Opposition leader Devendra Fadnavis is coming on a two day visit to Pandharpur on Monday and Tuesday

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. अवताडे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत.

विरोधी पक्ष नेते फडणवीस सोमवार आणि मंगळवार पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी ते मंगळवेढा तालुक्यात तर मंगळवारी पंढरपूर तालुक्यात सभा घेणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

आगीमुळे पाच दुकाने भस्मसात ! पंधरा दिवसातील जळीताची दुसरी घटना

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकतेच पंढरपूर-मंगळवेढा दौरा करून गेले. त्यांनी सभाही घेतल्या आणि अनेक लोकांच्या घरी सदिच्छा भेटी देखील दिल्या. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. अवताडे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत.

माहेरून तीन लाख रुपये आण, मला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दे म्हणून विवाहितेचा छळ

सोमवारी ते मंगळवेढा तालुक्यात बोराळे येथे सकाळी नऊ वाजता, नंदेश्वर येथे सकाळी दहा वाजता, डोंगरगाव येथे अकरा वाजता आणि मंगळवेढा शहरात दुपारी पावणे बारा वाजता येथे सभा घेणार आहेत तर मंगळवारी पंढरपूर तालुक्यात कासेगाव येथे दुपारी तीन वाजता, गादेगाव येथे दुपारी चार वाजता आणि पंढरपूर शहरात टिळक स्मारक मंदिराच्या पटांगणावर सायंकाळी पाच वाजता वाजता सभा घेणार आहेत.