पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छतेची कामे पूर्ण करण्याचे आदेश

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 27 मे 2020

सोलापूर शहरात सखल भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच त्यासाठी पाणी उपसा करणारे पंप उपलब्ध करून ठेवण्यात यावे, अशी सूचना महापौरांनी दिली. 

सोलापूर :  शहरातील सर्व नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करून घ्यावेत असा आदेश महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आज दिला. 

मान्सूनपूर्व करावयाच्या उपाय योजनांबाबत आयोजिलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस सभागृह नेते श्रीनिवास करली, नगर अभियंता संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, उपअभियंता विद्युत प्रवीण परदेशी,उद्यान प्रमुख निशिकांत कांबळे,अग्निशमक दल प्रमुख केदार आवटे जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे यांच्या सह झोन 1 ते 8 चे अधिकारी उपस्थित होते.

वाचा मूळ बातमी ः सोलापुरातील प्रमुख नाले भरले (VIDEO)

सोलापूर शहरासह सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून हा विषाणू आजार रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाळा सुरू होणार आहे.त्या अनुषंगाने  1 ते 8 झोन मधील सर्व नाल्याचे कामे मान्सून पुर्व  हे जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले आहे अशी महिती झोन अधिकाऱ्यांनी दिली.

सहा जेटिंग मशीन उपलब्ध असून प्रत्येक दोन झोन मध्ये एक जेटिंग मशीन वापरण्यात येत आहे.लाईट विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील विविध भागतील  लाईटचे मेंटनेस सुरू आहे.42 हजार लाइट्स सोलापूर शहरात आता पर्यंत बसवण्यात आले आहे. उद्यान विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील वाढ झालेल्या झाडेची छाटणी करण्यात आले असून धोकादायक झाडे तोडण्याचे काम चालू आहे .सोलापूर शहरातील विविध भागातील रस्त्यावरील दुभाजक मधली माती कडून त्या ठिकाणी शोभेचे झाड लावण्यात आले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिक वसाहती व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरून नागरिक जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते व घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सोलापूर शहरातील सर्व नाले, ड्रेनेज लाईन साफसफाई करणे व इतर सुविधा आणि उपाययोजना करण्याबाबत महापौरांनी आदेश दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to complete cleaning Stram drainage before monsoon