आवताडेंचा आवताडेंना तर गोडसेंचा भालकेंना ताप !

Pandharpur Mangalvedha assembly by election battle is on
Pandharpur Mangalvedha assembly by election battle is on

मंगळवेढा (सोलापूर) : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आखाड्यातील लढत अखेर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे हे चुलत बंधू एकमेकांच्या विरोधात समोर उभे ठाकले. त्यामुळे चुरशीच्या होणाऱ्या लढतीमध्ये कार्यकर्त्यांचा जीव मात्र भांड्यात पडला. यात आवताडेंना आवताडे, तर भगीरथ भालकेंना शैला गोडसे यांचा फटका बसण्याची भीती अधिक आहे. 

तालुक्‍याच्या राजकारणामध्ये शून्यातून आवताडे गटाने कोणताही राजकीय वारसा नसताना राजकीय वाटचाल करत विकास सोसायट्यांबरोबरच ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, खरेदी विक्री संघ, कृषी उद्योग संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती व दामाजी कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बॅंक अशा तालुक्‍यात राजकीय पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यावर वर्चस्व प्रस्थापित करताना आवताडे परिवार या नावाने तालुक्‍याबरोबर जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला होता. परंतु या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे गालबोट लागले. 

गत विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढलेले समाधान आवताडे यांना अखेर भाजपाने जवळ करत उमेदवारी दिली. त्यांच्या 50 हजारांपेक्षा अधिक मतदान असलेल्या या आवताडे गटाला परिचारक गटाचे पाठबळ देत भाजपाने आपला गट भक्कम केला असतानाच या गटाला गालबोट लागत खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी तरुणाईची साथ आपल्याला असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या आखाड्यातील पंढरपूर येथील नागेश भोसले यांचा अर्ज माघार घ्यावा, यासाठी परिचारकांची मधस्थी कामी आली. मात्र सिद्धेश्वर आवताडे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी आग्रह मग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्याबरोबर चर्चा करूनदेखील त्याला यश आले नाही. त्यामुळे हे दोघे एकमेकांच्या समोर उभे ठाकले. 

त्यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके अपक्ष उमेदवार म्हणून शैला गोडसे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे-पाटील यांचा देखील अर्ज आहे. आतापर्यंत असलेल्या आवताडे परिवाराच्या एकसंध कार्यकर्त्यांना आता कोणाचा झेंडा हाती धरावा, याचे कोडे पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळालेल्या नेत्यांनादेखील प्रचार करण्यासाठी अडचणीचे वाटू लागले आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी सिद्धेश्वर आवताडे यांची उमेदवारी अडचणीची ठरत असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी अपक्ष उमेदवार शैला गोडसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे-पाटील यांची उमेदवारी ठरली आहे. 

कार्यकर्ते संभ्रमात 

ऐन कडक उन्हाळ्यात होत असलेल्या निवडणुकीत उमेदवारासह कार्यकर्त्यांचाही घाम निघणार आहे. यामध्ये कोणता उमेदवार, यावर मात करणार हेदेखील पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमधून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यामुळे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पडले आहेत आणि ते संभ्रमातही आहेत. 

उमेदवारीचीच चर्चा 

आज दिवसभर इतर ठिकाणच्या कार्यकर्त्यांनीदेखील फोन करून सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीचे काय झालं, अर्ज माघार घेतलाय की ठेवलाय याची विचारणा अनेक ठिकाणावरून केली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com