परप्रांतीय कामगार निघून गेल्याने पेव्हर ब्लॉक व्यवसाय बंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फटका सर्व क्षेत्राला जाणवू लागला. बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेल्या पेव्हर ब्लॉक च्या कामावरील परप्रांतीय कामगार निघून गेल्यामुळे तालुक्‍यात हा व्यवसाय बंद पडला. 

मंगळवेढा(सोलापूर)ः परप्रांतीय कामगार कामावरून निघून गेल्याने परिसरातील पेव्हर ब्लॉक निर्मीतीचा व्यवसाय बंद पडला आहे. अनेक दिवसापासून गेलेले हे कामगार अद्याप परतले नसल्याने ही स्थिती झाली आहे. 

हेही वाचाः ग्रामीण भागातील भीती सोलापुरातील रुग्णालयांची 

कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फटका सर्व क्षेत्राला जाणवू लागला. बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेल्या पेव्हर ब्लॉक च्या कामावरील परप्रांतीय कामगार निघून गेल्यामुळे तालुक्‍यात हा व्यवसाय बंद पडला. 

हेही वाचाः शाळेत एकत्र खेळणे, डबा खाणे व धम्माल मस्तीची मजा संपेल का? 

छोटे रस्ते व घराचे अंगण अतिशय सुबक असावे यासाठी पेवर ब्लॉक च्या विविध रंगातील फरशी बसवण्यासाठी लोकांचा कल वाढीस लागला. शासकीय कार्यालय व बंगल्याबरोबर व विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक च्या विविध डिझाईन शोभून दिसतात. त्यामूळे हा व्यवसाय अलीकडच्या काळात तालुक्‍यात जोर धरू लागला. यामध्ये तालुक्‍यातील काही नवोदित इथे ठेकेदारांनी परप्रांतीय मजुराला धरून हा व्यवसाय तालुक्‍यांमध्ये सुरू केला. त्यासाठी भागभांडवलासाठी लाखो रुपयांची बॅंकेची मदत देखील घेतली. मोठ्या कष्टाने यासाठी लागणारा कच्चामाल उपलब्ध केला. 
परंतु मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे पेव्हर ब्लॉक व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. कोरोनाच्या भितीने कामावरील कामगारांनी कामे अर्धवट ठेवत गावी परत गेले. आतापर्यंत कष्टातील जास्त मिळकत ही वाहन खर्चात घालवत आपले गाव गाठण्यात धन्यता मानली. त्यामध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगाल येथील कारागिराचा समावेश होता. ब्लॉक तयार करणारे आणि बसवणारे हे कामगार निघून गेल्याने हा व्यवसाय बंद पडला. बांधकाम क्षेत्रात याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने या व्यावसायिकांची मोठीच अडचण होऊन बसली आहे. 

शासनाने मदत करावी
कोरोना संकटामुळे हा व्यवसाय पूर्णपणे बसल्यामुळे सध्या कर्जबाजारी होण्याची वेळ आली. हा व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना या व्यवसायातील कौशल्य शिकवण्याची गरज आहे. व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाने देखील हातभार लावणे गरजेचे आहे 
- सरोज काझी, डायमंड पेव्हर ब्लॉक इंड्रस्टीज, मंगळवेढा  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paver block business closed due to departure of foreign workers