शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत असे सुचवले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांना संघटनेच्या वतीने खालील निवेदन देण्यात आले.
या वेळी संघटनेचे सेक्रेटरी जव्हेरी, सुनील कामतकर, चंद्रशेखर याबाजी, संजय पाथरकर, शशिकांत कलबुर्गी, घनशाम कदम, श्री. परदेशी, रतन अगरवाल उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन त्यांचे प्रश्न मांडले.
सोलापूरः कोचिंग क्लास च्या प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन (पीटीए) च्या वतीने सोलापुरात शाळा सुरू झाल्या असल्याने त्याच नियमांच्या आधारावर कोचिंग क्लासेस सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचाः अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळख असलेले माढा आता होणार फुलांचा गाव
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत असे सुचवले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांना संघटनेच्या वतीने खालील निवेदन देण्यात आले.
या वेळी संघटनेचे सेक्रेटरी जव्हेरी, सुनील कामतकर, चंद्रशेखर याबाजी, संजय पाथरकर, शशिकांत कलबुर्गी, घनशाम कदम, श्री. परदेशी, रतन अगरवाल उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन त्यांचे प्रश्न मांडले.
हेही वाचाः वीरशैव लिंगायतचा रविवारी राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा
सोलापूर शहरात शाळा सुरू झाल्या आहेत. नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचा मागे पडलेला अभ्यास तातडीने करण्यासाठी कोचिंग क्लासेसची मदत लागणार आहे. शाळा सूरू झाल्याने आता कोचिंग क्लास सुरू होणे गरजेचे आहे.
गेल्या आठ महिन्यापासून कोचिंग क्लासेस बंद आहेत. त्यामुळे आमच्या शिक्षकांवर व स्टाफवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आजपर्यंत लॉकडाउनच्या काळातील हॉलचे भाडे, लाईट बिल व इतर खर्च निघाला नाही.
आता सोमवार (ता.23) पासून नववी ते बारावी शाळा सुरू झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी नियमावाली (एसओपी) तयार केलेली आहे. त्याच प्रमाणे कोचिंग क्लासेस बाबतीत नियमावली तयार करून करून क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. त्यासाठी सर्व कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांची कोरोना टेस्ट, दररोज हॉल सॅनिटायझेशन करून घेणे, विद्यार्थ्यांसाठी थर्मल स्क्रिनींग, हॉलवर सॅनिटायझरचा वापर, एका बाकावर एक विद्यार्थी या सारख्या सर्व नियमाचे पालन केले जाईल. महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या सर्व अटींचे आम्ही तंतोतंत पालन केले जाणार आहे. तरी शिक्षकांची तळमळ लक्षात घेऊन आम्हा क्लास सुरू करण्याची परवानगी द्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.