राजकीय दुष्काळ संपला, पाण्याचा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील 

दत्तात्रय खंडागळे
Sunday, 27 September 2020

बुद्धेहाळ (ता. सांगोला) येथे पाणी पूजनानिमित्त आमदार पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी सभापती संभाजी आलदर, शाखा अभियंता लक्ष्मण केंगार ऍड. उदय घोंगडे, दगडू बाबर, पोपट यादव, दीपक खटकाळे यांच्यासह बुद्धेहाळ व कोळा परिसरातील नागरिक उपस्थित होते. पाणीप्रश्न हा सांगोला तालुक्‍यातील सर्वात महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न समजला जातो. याबाबतच आमदार पाटील म्हणाले की, दीपकआबांमुळेच सांगोला तालुक्‍याचा राजकीय दुष्काळ आणि बापूंचा राजकीय वनवास संपला. 

सांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला राजकीय दुष्काळ संपविण्यात यश मिळाले. आता दीपकआबांच्या मदतीनेच तालुक्‍याचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाण्याचा दुष्काळही संपवणार, असे प्रतिपादन सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी केले. 

हेही वाचाः प्रहार शिक्षक संघटनेचे कोरोना सर्वेक्षणावर बहिष्कार 

बुद्धेहाळ (ता. सांगोला) येथे पाणी पूजनानिमित्त आमदार पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी सभापती संभाजी आलदर, शाखा अभियंता लक्ष्मण केंगार ऍड. उदय घोंगडे, दगडू बाबर, पोपट यादव, दीपक खटकाळे यांच्यासह बुद्धेहाळ व कोळा परिसरातील नागरिक उपस्थित होते. पाणीप्रश्न हा सांगोला तालुक्‍यातील सर्वात महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न समजला जातो. याबाबतच आमदार पाटील म्हणाले की, दीपकआबांमुळेच सांगोला तालुक्‍याचा राजकीय दुष्काळ आणि बापूंचा राजकीय वनवास संपला. 

हेही वाचाः विद्यार्थी गटांच्या माध्यमातून सोडवली अध्ययनाची समस्या 

आता त्यांना सोबत घेऊनच सांगोला तालुक्‍यातील गंभीर असलेला पाणीप्रश्न मार्गी लावून संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम करणार आहे. कष्ट करण्याची प्रचंड तयारी असूनही केवळ पाणी नसल्याने सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांची हेळसांड होत होती. तालुक्‍याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही शासकीय पातळीवर वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर सातत्यपूर्ण प्रयत्न व महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे असलेले अचूक नियोजन यामुळेच आज सांगोला तालुक्‍यातील माण, कोरडा व अफ्रुका या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर तालुक्‍यातील चिंचोली, बुद्धेहाळ व पारे या ठिकाणी असलेले तलावही तुडूंब भरले आहेत. 

सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरुन देण्यासाठी कटिबद्ध 
1998 नंतर म्हणजे तब्बल 22 वर्षांनी प्रथमच बुद्धेहाळचा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांना तब्बल 22 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. यापुढील काळात शेतकऱ्यांना संघर्ष किंवा अशी प्रतीक्षा करावी लागणार नाही. याची काळजी घेऊ आणि दरवर्षी सांगोला तालुक्‍यातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी कटिबद्ध राहू. 
- दीपक साळुंखे-पाटील  माजी आमदार 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political drought is over, water drought will also end: MLA Shahaji Patil