तुटवडा व आवक घटल्याने बटाट्याचे भाव 50 रुपये किलो 

प्रकाश सनपूरकर
Tuesday, 1 December 2020

सर्वसाधारणपणे बटाट्याचे भाव हे हिरव्या भाजीपाल्याच्या तुलनेत नेहमीच स्वस्त असतात. पंचवीस ते तीस रुपये किलो असा भाव कायम असतो. जेव्हा हिरवा भाजीपाला महागलेला असतो तेव्हा स्वस्त भाजी म्हणून बटाट्याची खरेदी होते. तसेच उपवासाच्या काळात बटाट्याची मागणी वाढली तरी भाव बऱ्यापैकी स्थिर असतात. पण या वर्षी बटाट्याच्या बाजारपेठ अगदी पहिल्यांदाच बदलली आहे. 

सोलापूरः शहरातील बाजारपेठेत हिरव्या भाजीपाल्याच्या तुलनेत स्वस्त असलेल्या बटाट्याचे भाव सध्या मात्र वधारला आहे. बटाट्याचा भाव इतर भाज्यांच्या तुलनेत वाढून चक्क पन्नास रुपये किलो इतका झाला आहे. यावर्षी लॉकडाउनमध्ये वर्षभर वापरला जाणारा बटाटा मोठ्या प्रमाणात वापरल्याने सध्या आवक घटली आहे. तसेच नवा माल बाजारात येण्यास उशिर असल्याने, बटाट्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

हेही वाचाः महिलेसह पतीवर चाकू हल्ला 

सर्वसाधारणपणे बटाट्याचे भाव हे हिरव्या भाजीपाल्याच्या तुलनेत नेहमीच स्वस्त असतात. पंचवीस ते तीस रुपये किलो असा भाव कायम असतो. जेव्हा हिरवा भाजीपाला महागलेला असतो तेव्हा स्वस्त भाजी म्हणून बटाट्याची खरेदी होते. तसेच उपवासाच्या काळात बटाट्याची मागणी वाढली तरी भाव बऱ्यापैकी स्थिर असतात. पण या वर्षी बटाट्याच्या बाजारपेठ अगदी पहिल्यांदाच बदलली आहे. 

हेही वाचाः आळंदी वारीसाठी परवानगी द्यावी ः अखिल भारतीय वारकरी मंडळाची मागणी 

मागील आठ ते दहा महिन्याच्या काळात लॉकडाउन मध्ये हिरव्या भाजीपाल्या लोकापर्यंत पोहोचल्या नसल्याने बटाट्याचा वापर वाढला होता. हा वापर इतका जास्त होता की वर्षभरातील बटाट्याचे उत्पादन जवळपास संपत आले. तसेच वाहतुकीच्या प्रश्‍नामुळे व्यापाऱ्यांची अडचण झाली. आग्रा, इंदोर आदी बाजारपेठातून बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. पण माल पुरेसा मिळत नसल्याने व्यापाऱ्यांना ट्रक पाठवणे अशक्‍य होऊ लागले. बटाट्याची आवक जवळपास अर्ध्यावर आली. तसेच नवा बटाटा येण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. 
सोलापूर मार्केट यार्डातील व्यापारी दररोज आठ ते दहा ट्रक माल मागवत होते. आता आवक व वाहतुकीच्या अडचणीने चार ते पाच ट्रक माल येत आहे. या प्रकारामुळे ठोक बाजारात बटाट्याचे भाव 40 ते 42 रुपये एवढे झाले आहेत. किरकोळ बाजारात पन्नास रुपये किलो भाव मिळू लागला आहे. हिरव्या भाज्या स्वस्त व बटाटा महाग असा वेगळाच प्रकार नागरिकांना अनुभवण्यास मिळाला आहे. बटाट्याच्या बाजारात अजुनही नव्या मालाची आवक झालेली नाही. दरम्यान, शहरातील ठोक भाजी व्यापारी सातत्याने वाहने उत्तर भारतातील बाजारपेठामध्ये बटाटा आणण्यासाठी पाठवत असले तरी तेथून मालाची उपलब्धता पुरेशी होत नाही ही अडचण झाली आहे. या वर्षीचा नवा माल येण्यास अजूनही काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे बटाट्याचे भाव कमी होण्याची शक्‍यता नाही. 

नवा बटाटा येईपर्यंत दर जास्त 
वर्षभरातील जुन्या बटाट्याची आवक लॉकडाउनमध्ये अधिक वापर व वाहतुकीच्या अडचणीने विस्कळित झाली आहे. त्यामुळे बटाट्याचे भाव वाढले आहे. नविन मालाची आवक सुरू झाल्यावर भावात फरक पडण्याची शक्‍यता आहे. 
- बिलाल महमंद बागवान, बटाटा व्यापारी, मार्केट यार्ड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price of potato has gone up by Rs 50 per kg due to shortage and declining income