कंटेन्मेंट झोनच्या विळख्यात सापडले "प्रिंटिंग हब'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे साखर पेठ परिसर कंटेन्मेंट झोनच्या विळख्यात अडकल्याने हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर 22 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे सोलापूर शहरातील अनेक मोठ्या उद्योगांबरोबरच येथील प्रिंटिंग व्यवसायही दोन महिन्यांपासून बंद आहे. यात कोट्यवधींची गुंतवणूक केलेल्या मोठ्या व्यावसायिकांसह छोट्या व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे.

सोलापूर: पुणे, मुंबई यासह आंध्र प्रदेश, तेलंगण व कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांतील छपाईची कामे सोलापुरात होत असल्याने प्रिंटिंग हब म्हणून सोलापूरची ओळख आहे. शहरातील साखर पेठ परिसरात मोठ्या प्रेससह छोटे स्क्रीन प्रिंटर्स, पेपर व प्रिंटिंगसंबंधी साहित्याची दुकाने एकवटली आहेत. लॉकडाउनमुळे व्यवसाय दोन महिन्यांपासून बंद आहे. 

हेही वाचाः तुळजापूर रोड नाका पुलाखाली परप्रांतीयांना आश्रय 

मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे साखर पेठ परिसर कंटेन्मेंट झोनच्या विळख्यात अडकल्याने हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर 22 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे सोलापूर शहरातील अनेक मोठ्या उद्योगांबरोबरच येथील प्रिंटिंग व्यवसायही दोन महिन्यांपासून बंद आहे. यात कोट्यवधींची गुंतवणूक केलेल्या मोठ्या व्यावसायिकांसह छोट्या व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर या व्यवसायातील थेट काम करणारे एक हजार 200 कामगार व या व्यवसायाशी निगडित डीटीपी ऑपरेटर, बायंडिंग, पाकिटे तयार करणारे असे जवळपास सहा हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. घरोघरी स्क्रीन प्रिंटिंग करणारे व छोट्या व्यावसायिकांची अवस्था खूपच बिकट झाली आहे, अशी माहिती सोलापूर मुद्रक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

हेही वाचाः दुकाने सुरू करण्याच्या मागणीसाठी व्यापारी महापालिकेत 

व्यवसायावर झालेला परिणाम 
70 ते 80 लाखांचा व्यवसाय असलेल्या लग्नसराईतील लग्नपत्रिका छपाईची कामे हातची गेली 
ऑर्डर घेतलेल्या लग्नपत्रिका छापून तयार मात्र लग्न रद्द झाल्याने प्रेसमध्येच आहेत पडून 
शहरातील उद्योग-व्यवसाय बंद असल्याने चादर टॉवेलचे लेबल, बिलबुके, पावती बुके छपाई नाही 
शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय स्टेशनरी, उत्तरपत्रिका, प्रश्‍नपत्रिका प्रगतिपुस्तकांची छपाई नाही 
मोठ्या प्रेसमधील कामगारांना पगार देण्यासाठी मालकांना कर्ज काढावे लागत आहे 
छोट्या प्रेसमधील मालक व कामगारांची सुरू आहे उपासमार 

दोन कोटींपेक्षा जास्त नुकसानीचा अंदाज 
अचानकच सुरू झालेल्या लॉकडाउनने प्रिंटिंग व्यावसायिकांना सावरायला वेळच मिळाला नाही. दोन महिन्यांपासून मशिनरी थांबून असल्याने त्याचे स्पेअरपार्ट खराब होणार आहेत. त्यासाठी मेंटेनन्सचा फटका बसणार आहे. तसेच शाई, केमिकल वाळून गेल्याने त्याचेही वेगळेच नुकसान होणार आहे. एकूणच प्रिंटिंग प्रेस व्यवसायाला दोन कोटींहूनही जास्त फटका बसल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. 
 
हातची कामे गेली अन मशीनरीचे नुकसान 
अचानक सुरू झालेल्या लॉकडाउनने आम्हाला सावरायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे हातची कामे तर गेलीच शिवाय महागड्या मशिनरींचेही नुकसान सहन करावे लागत आहे. प्रसंगी कर्ज काढून कामगारांना पगार द्यावा लागत आहेत. छोट्या व्यावसायिकांची अवस्था तर खूपच बिकट झाली आहे. शासनाने या व्यवसायाला पॅकेज देऊन सावरावे. कामगारांना महिना पाच हजार रुपयांची मदत करावी. 
- नागेश शेंडगे, उपाध्यक्ष, सोलापूर मुद्रक संघ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: printing buisness disturbed due to corona