"या' संघटनेचे अध्यक्ष म्हणतात, सरकारचे नियंत्रण नसल्यानेच शेतकऱ्यांच्या दुधावरची साय खाताहेत खासगी संस्था 

संजय हेगडे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

दूध दरावरून महाराष्ट्रात आंदोलन पेटले आहे. सोलापूर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने तिसंगीत दुग्धाभिषेक घालून खासगी संस्था व शासनाचा निषेध करीत आंदोलनास सुरवात केली. तिसंगी गावातील शेतकऱ्यांनी सहा हजार लिटर दूध घरीच ठेवून शासनाचा निषेध केला. या वेळी "पांडुरंग'चे संचालक तानाजी वाघमोडे, उपसरपंच गोरख पाटील, दीपक मासाळ, मल्हारी हेगडे, राजन ढोणे, अशोक पवार, समाधान हेगडे आदींसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

तिसंगी (सोलापूर) : जिल्ह्यात शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय दुय्यम व्यवसाय असल्याने शेतकरी कसाबसा सावरला होता. पण शेतकऱ्यांच्या दुधावरची साय खासगी संस्था खात आहेत. महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण नसल्याने प्रत्येक संस्थेचा वेगवेगळा दर आहे. शेतकऱ्यांना मात्र 18 ते 19 रुपये दर देऊन पिळवणूक करत आहेत. गेली दहा वर्षे झाली शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना, त्यात कोरोना रोगाने थैमान घातल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे दूध कवडीमोल दराने खरेदी केले जात आहे. आज शेतकऱ्यास कोणी वालीच उरला नाही. परराज्यातील दूध संस्थांनी वर्चस्व गाजवायला सुरवात केली आहे. त्यांचा दर महाराष्ट्रातील डेअरीपेक्षा पाच रुपयांनी जास्त आहे, अशा शब्दांत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष समाधान फाटे यांनी सरकारचा निषेध केला. 

हेही वाचा : कोरोनाची नव्हे तर "याची' आहे शेतकऱ्यांमध्ये दहशत; लाखोंचा खर्च वाया, तरीही प्रभावी औषध नाहीच 

दूध दरावरून महाराष्ट्रात आंदोलन पेटले आहे. सोलापूर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने तिसंगीत दुग्धाभिषेक घालून खासगी संस्था व शासनाचा निषेध करीत आंदोलनास सुरवात केली. तिसंगी गावातील शेतकऱ्यांनी सहा हजार लिटर दूध घरीच ठेवून शासनाचा निषेध केला. या वेळी "पांडुरंग'चे संचालक तानाजी वाघमोडे, उपसरपंच गोरख पाटील, दीपक मासाळ, मल्हारी हेगडे, राजन ढोणे, अशोक पवार, समाधान हेगडे आदींसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. 

हेही वाचा : कोरोना खिसा कापतोय अन्‌ जीवही घेतोय; सिव्हिल, मार्कंडेय, अश्‍विनी, यशोधरामध्ये सर्वाधिक मृत्यू 

या वेळी बालाजी पाटील म्हणाले, शासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना दूध दरवाढ करावी. महाराष्ट्र खासगी व सहकारी संस्थांवर शासनाचे नियंत्रण असावे. शासनाकडून नियमानुसार दूध दर मिळावा. 

हॅटसन डेअरी, सोनकेचे चालक शिवाजी बनसोडे म्हणाले, हॅटसन डेअरी परराज्यातील असून 24 रुपये दर द्यायला परवडतोय. मग महाराष्ट्रातील दूध संस्था का दर देत नाही? इतर डेअरीमुळे आज हॅटसन दूध उत्पादकांचा तोटा झाला आहे. 

शेतकरी विष्णू ढोणे म्हणाले, शासनाचे नियंत्रण नसल्याने आमचे दूध वाया गेले. आज मी हॅटसन डेअरीचा उत्पादक शेतकरी असून मला 24 रुपये दर मिळतो. मी समाधानी आहे. पण इतर संस्थांमुळे माझे आज 50 लिटर दूध वाया गेले. त्यात कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. 

दूध उत्पादक शेतकरी सचिन हेगडे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये दर मिळावा. 10 रुपये अनुदान द्यावे. अन्यथा दूधदराचे आंदोलन असेच सुरू राहील. 

दूध उत्पादक शेतकरी मल्हारी पाटील म्हणाले, दोन वर्षे झाली दूध व्यवसाय चालू केला आहे. पण महिनाभर खासगी दूध डेअरीने 19 रुपये दराने दूध खरेदी करून शेतकऱ्यांची होरपळ सुरू केली. इतर डेअरीप्रमाणे दर मिळावा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest of private organization and government on behalf of Milk Producers Farmers Struggle Committee