एसएफआयची जेईई, नीट व अंतिम वर्ष परिक्षांच्या निर्णयाविरोधात निदर्शने 

sfi aandolan.jpg
sfi aandolan.jpg
Updated on

सोलापूर : येथील स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा निर्णयाच्या विरोधात बुधवारी (ता.2) रोजी निदर्शने करण्यात आली. 

जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा या परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात एसएफआय व सर्व डाव्या पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी आज देशव्यापी आंदोलन केले. सोलापूर शहरात देखील या संघटना पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. 

यावेळी पुढील मागण्या मांडण्यात आल्या. जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. अंतिम वर्षाच्या परीक्षा किमान दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात. परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा देखील विचार व्हावा. जसे की असाईटमेंटच्या माध्यमातून परीक्षा घेता येईल. ते सबमिट करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यलयात संगणक व इंटरनेटची व्यवस्था करता येईल. जेणेकरून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव काही विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा देता येत नसेल तर त्यांना तसा वेळ वाढवून देण्यात यावा. अपंग विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सरकारने परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रवासाची मोफत व्यवस्था करावी. परिक्षेदरम्यान सर्व विद्यार्थ्यांच्या मोफत निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात यावी. सर्व परीक्षा केंद्रे सॅनिटाईझ करावेत. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी. त्यांना महामारीची लागण होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात यावी. परीक्षा देण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याची दक्षता घेण्यात यावी. परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही धोका निर्माण झाल्यास आरोग्य विमा देण्यात यावा. पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित 108 महाविद्यालयातुन 22 हजार विद्यार्थी अंतिम वर्ष परीक्षा देणार असून या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी एसएफआय चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, सहसचिव शामसुंदर आडम, पल्लवी मासन, जि. क. सदस्य दुर्गादास कनकुंटला, पूनम गायकवाड, अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, प्रिया कीर्तने आदी उपस्थित होते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com