दसरा दिवाळीत बाजारात मोबाईलच्या नविन मॉडेल्सची रेंज दाखल

प्रकाश सनपूरकर
Friday, 23 October 2020

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाइल खरेदी अगदी दुपटीने वाढली. त्यावेळी काही कंपन्यांची मोबाईल उपलब्ध देखील होत नव्हते. त्यानंतर आता दसरा, दिवाळीसाठी मोबाईल मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग यासह अनेक कंपन्यांची मोबाईल नव्या मॉडेलमध्ये उपलब्ध झाले आहेत.

सोलापूरः शहरातील मोबाईल बाजारात दसरा, दिवाळीनिमित्त मोबाईल अनेक नवीन मॉडेल्स खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. लॉकडाउनंतर दिवाळीसाठी अनेक डिस्काउंट, कर्जयोजना व विशेष सुविधा ग्राहकांसाठी आकर्षण बनल्या आहेत. 

हेही वाचाः महिलातील रोगांवर वार करणारी दुर्गा डॉ.अर्चना खरे 

सोलापूर मार्केट दसरा-दिवाळीच्या खरेदीसाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. अनेक प्रकारचे नवीन मॉडेल्स बाजारात दाखल झाले आहेत. यावर्षी लॉकडाउन नंतर बाजारपेठ उघडल्यावर सर्वाधिक प्रतिसाद मोबाइल खरेदीला मिळाला होता. 

हेही वाचाः तेलुगु भगिनींचा आवडत्या ब्रतुकम्मा सणाची अख्यायिका 

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाइल खरेदी अगदी दुपटीने वाढली. त्यावेळी काही कंपन्यांची मोबाईल उपलब्ध देखील होत नव्हते. त्यानंतर आता दसरा, दिवाळीसाठी मोबाईल मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग यासह अनेक कंपन्यांची मोबाईल नव्या मॉडेलमध्ये उपलब्ध झाले आहेत. दिवाळीनिमित्त यामध्ये एफ 17 प्रो, एफ 17, ए 53, सॅमसंग एम31, एम 51, वाय 20, वाय 30, वाय 50 असे अनेक मॉडेल उपलब्ध झाली आहे. अनेक कंपन्यांचे मोबाईल अगदी ऑनलाइनच्या दराप्रमाणे मिळत असल्यामुळे ग्राहकांसाठी ते सोयीचे झाले आहे. स्थानिक बाजारात केलेल्या खरेदीसाठी आवश्‍यक ती सर्विस व्हरायटी पाहता येते. यादृष्टीने त्याचे महत्त्व आहे. सणाच्या काळत नवीन मॉडेल खरेदीला चांगला प्रतिसाद असतो. या मॉडेलमध्ये मेमरी, कॅमेरा क्वालिटी, साऊंड क्वालिटी अशा अनेक वैशिष्ट्यांची माहिती घेऊन ग्राहक मोबाईल खरेदी करत आहेत. 

नविन मॉडेल्स उपलब्ध 
अनेक कंपन्याचे मोबाईल दसरा-दिवाळीसाठी उपलब्ध झाले आहेत. नव्या मॉडेलसची विक्री देखील चांगल्या पध्दतीने होत आहे. 
- प्रदीप जैन, मोबाईल विक्रेता 

कर्ज योजनांची मदत 
अनेक प्रकारच्या रेंजमध्ये मोबाईल विक्रीसाठी आले आहेत. यामध्ये अधिक किमतीच्या मोबाईलसाठी कर्ज योजना देखील उपलब्ध आहेत. 
- महेश मोहोरकर, मोबाईल विक्रेता 

आकर्षक फीचर्स 
आकर्षक मोबाईल मॉडेल्सची मोठी रेंज उपलब्ध झाली आहे. विविध फीचर्समुळे मॉडेलची वैशिष्ट्ये वेगळी ठरत आहेत. 
- अविनाश गवसने, मोबाईल विक्रेता 

सवलती व योजना 
कंपन्यांनी ग्राहकांना मोबाईल खरेदीसोबत छोट्यामोठ्या योजना देखील दिल्या आहेत. तसेच कर्ज उपलब्ध केल्याने मोठ्या किमतीचे मोबाईल खरेदी करणे सुलभ झाले आहे 
- धीरज ब्रिजवासी, मोबाईल विक्रेता  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Range of new models of mobiles launched in Dussehra Diwali market