अफगाणिस्तानातून प्रथमच दाखल झाला पक्ष्यांचे माहेरघर सोलापूर जिल्ह्यात दुर्मिळ "छोटा खरुची'!

प्रकाश सनपूरकर
Saturday, 24 October 2020

येथील निसर्ग अभ्यासक शिवानंद हिरेमठ, संतोष धाकपाडे, सुशांत कुलकर्णी, ऋतुराज कुंभार, सचिन पाटील, महादेव डोंगरे आणि रत्नाकर हिरेमठ हे पक्षी निरीक्षण करण्यासाठी गेले असता त्यांना छोटा खरुची ( लेसर केस्ट्रेल) हा पक्षी दिसून आला. या छोटा खरुची पक्ष्याची नोंद सोलापूर जिल्ह्यात प्रथमच झालेली आहे. भारतात फारच कमी ठिकाणी हिवाळी पाहुणा म्हणजेच छोटा खरुची महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतक्‍याच ठिकाणीच दिसलेला आहे. सोलापूरातील पक्षी अभ्यासकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. 

सोलापूरः शहर व परिसरात या वर्षीच्या हिवाळी हंगामात अनेक नवीन पक्षी आढळले आहेत. त्यामध्ये अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा छोटा खरुची पक्षी आता दाखल झाला आहे. या वर्षी पहिल्यांदाच त्याची नोंद झाली आहे. 

हेही वाचाः दसरा दिवाळीत बाजारात मोबाईलच्या नविन मॉडेल्सची रेंज दाखल 

सोलापूर हे पक्ष्यांचे माहेर घर आहे हे पक्षीतज्ञ डॉ. सलीम अलीं यांनी मांडलेले मत पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. सोलापूर जिल्ह्यात या दोन तीन वर्षात नवनवीन पक्ष्यांच्या नोंदी होत आहेत. ही पक्षी अभ्यासकांसाठी खुप आनंदाची बाब आहे. 

हेही वाचाः दिवाळीसाठी नांदेड-पनवेल- नांदेड विशेष रेल्वे फेरीची सुरुवात 

या ऑक्‍टोबर महिन्यात तर छोटा क्षत्रबलाक, धुतर ससाणा, शाहीन ससाणा हे पक्षी सोलापूर जिल्ह्यात आढळून आलेले आहे. 
येथील निसर्ग अभ्यासक शिवानंद हिरेमठ, संतोष धाकपाडे, सुशांत कुलकर्णी, ऋतुराज कुंभार, सचिन पाटील, महादेव डोंगरे आणि रत्नाकर हिरेमठ हे पक्षी निरीक्षण करण्यासाठी गेले असता त्यांना छोटा खरुची ( लेसर केस्ट्रेल) हा पक्षी दिसून आला. या छोटा खरुची पक्ष्याची नोंद सोलापूर जिल्ह्यात प्रथमच झालेली आहे. भारतात फारच कमी ठिकाणी हिवाळी पाहुणा म्हणजेच छोटा खरुची महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतक्‍याच ठिकाणीच दिसलेला आहे. सोलापूरातील पक्षी अभ्यासकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. 

छोटा खरुची हा दिसायला खरुची सारखा दिसतो. छोटा खरुची महाराष्ट्रात काही मोजक्‍या ठिकाणीच दिसून येतो. हा पक्षी आपल्याकडे अफगाणिस्तान, चीन , मंगोलिया येथून येतो. हिवाळ्यात सहसा आफ्रिका, पाकिस्तान व भारतातील काही ठिकाणी दिसतो. ह्या पक्ष्यांचे घटणारे अस्तित्व पाहता त्यास धोकाप्रवण गटामध्ये समाविष्ट केले गेले आहे. पांढऱ्या नखांवरून हा पक्षी ओळखला जाऊ शकतो. या पक्ष्याचे खाद्य हे कीटक आहेत. खरुचीच्या तुलनेत ह्याचे पंख आणि शेपटीची लांबी कमी असते. हा किड्यांसोबत लहान पक्षी, सरपटणारे प्राणी पण खातो. सोलापुरात हा छोटा खरुची पक्षी दिसल्याने पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rare "small-bred" bird from Afghanistan