राईनपाडा प्रकरणात चार जणांची साक्ष तपासली 

-
-
Updated on

सोलापूर/धुळे : राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे परजिल्ह्यातील पाच निरपराध भिक्षुकांचा निर्दयीपणे ठेचून खून केल्या प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी (ता. २८) चार जणांची साक्ष तपासण्यात आली. न्यायालयात आज बुधवारी (ता. 29) पुन्हा याबाबत कामकाज होणार आहे.
राईनपाडा येथे १ जुलै 2018 ला सकाळी अकरानंतर मुलांना पळविणारी, किडनी चोरणारी टोळी दाखल झाल्याची अफवा पसरली. गावातील आठवडे बाजारात आलेल्या तीन ते चार हजारांवर ग्रामस्थांनी खवे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथून आलेल्या नाथपंथी डवरी समाजातील भिक्षुक भारत शंकर भोसले, भारत शंकर माळवे, दादाराव शंकर भोसले, राजू भोसले, अग्नू इंगोले यांच्यावर हल्ला करीत त्यांची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित 44 जणांवर जिल्हा न्यायालयात दोषारोप सादर केले असून, न्यायाधीश उगले यांच्यापुढे खटल्याचे कामकाज सुरू आहे. साक्री पंचायत समितीचे माजी सभापती गणपत सदा चौरे, शेतकरी विश्‍वास दौलत बागूल (रा. राईनपाडा), नर्मदाबाई भारत भोसले (रा. मंगळवेढा), वसंत दत्तू साबळे (रा. कुऱ्हे, ता. साक्री) यांची साक्ष नोंदविण्यात आली. नर्मदाबाई यांच्या पतीसह अन्य दोन जवळच्या नातेवाइकांचा मृतामध्ये समावेश होता, त्याबाबत नर्मदाबाई यांची साक्ष घेण्यात आली.

ॲड. निकम पांढरे यांच्यात चर्चा
न्यायालयीन कामकाजानंतर विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी शासकीय विश्रामगृहात पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांच्याशी चर्चा केली. राईनपाडा प्रकरणातील काही आरोपींना न्यायालयात हजर केले, काही आरोपींना यापुढेही न्यायालयात हजर करावे लागेल, कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्‍न निर्माण होणार नाही, शांतता अबाधित राहील या आनुषंगिक मुद्यांवर ऍड. निकम आणि श्री. पांढरे यांच्यात चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.
solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
Marathi News Esakal
www.esakal.com