Video : पीओपी फोडून चोरटा घुसला दुकानात! अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

चोरटा छताचे पीओपी फोडून आत आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वनस्कर यांच्या दुकानात चोरट्याला रोकड हाती लागली नाही. त्याला रिकाम्या हाताने जावे लागले.

सोलापूर : विजयपूर रस्त्यालगत मेडिकल, अपना बझार, वनस्कर फूट वेअर, डीके ज्यूस सेंटर अशी चार दुकाने चोरट्यांनी फोडली. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. विजापूर नाका पोलिस आणि गुन्हे शाखेला चोरट्यांनी आव्हान दिले आहे. छताची पीओपी फोडून चोरटा घुसला आणि चोरी केली.

पहा व्हिडिओ.. :

 
कर्नाटकात घुसून उद्धवस्त केला गुटख्याच्या कारखाना

संजय शरदचंद्र गांधी (वय 56, रा. वसंत विहार, जुना पुणे नाका, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. चोरट्याने गांधी यांचे विजयपूर रस्त्यालगत माजी सैनिकनगर येथील यश फार्मा केअर हे मेडिकल दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. टेबलच्या ड्राव्हरमधील 15 दिवसांपासून जमा झालेली 56 हजार 125 रुपयांची रोकड चोरून नेली. 

मी कोण आहे ओळखत नाही का? बघून घेतो..

विजयपूर रस्त्यालगत आनंदनगर येथील अपना बझार सुपर मार्केट येथे चोरी झाली. चोरट्याने छताचे पीओपी फोडून आत प्रवेश केला. आतील 25 हजार रुपये चोरून नेले. सकाळी सफाई कामगार मुलीने दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. याच परिसरातील श्रीकांत प्रभूजी वनस्कर यांचे वनस्कर फूट वेअर हे दुकानही चोरट्याने फोडले. चोरटा छताचे पीओपी फोडून आत आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वनस्कर यांच्या दुकानात चोरट्याला रोकड हाती लागली नाही. त्याला रिकाम्या हाताने जावे लागले. या चार घटनांच्या माध्यमातून चोरट्याने पोलिसांना आव्हान दिले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हालचालीनुसार पोलिसांनी चोरट्याच्या तपासाला सुरवात केली आहे. तसेच डीके ज्यूस सेंटर येथेही चोरीचा प्रयत्न झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The roof broke and theft