सरकारी बाबूंवर लक्ष ठेवणार "आरटीएस महाराष्ट्र' 

logo
logo

सोलापूर : सरकारी कार्यालयात तुमचे काम वेळेवर होत नाही?, एकाच कामासाठी तुम्हाला वारंवार हेलपाटे मारावे लागतात? कार्यालयात आल्यावर कधी साहेब गैरहजर तर कधी टेबलचा माणूस गायब? यासह अशा अनेक समस्यांना तोंड देत सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयातील कामे करावी लागत आहेत. राज्य सरकारने आणलेल्या सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी "आरटीएस महाराष्ट्र' हे मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या मोबाईल ऍप्लीकेशनच्या माध्यमातून आता सरकारी बाबूंवर वॉच असणार आहे. 
हेही वाचा - भाषेवर कोणाची मक्तेदारी नसते 
सेवा हमी हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्याचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या कॉन्फरन्समध्ये सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महा ऑनलाईनचे जिल्हा समन्वयक शशिकांत इगवे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प संचालक रिझवान मुल्ला आदी सहभागी झाले होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, प्रत्येक कार्यालयाबाहेर सेवा हमी हक्क कायद्यातील अधिसूचित सेवा बद्दल माहिती दर्शक फलक लावावा. नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, कृषी विभागाचे रवींद्र माने त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com