esakal | अर्रर्र ! वसुलीला आले नाहीत म्हूणन अडविला पगार 
sakal

बोलून बातमी शोधा

solapur-municipal-corporation

वेतन थांबविण्याचा आयुक्‍तांनी घेतला निर्णय 
महापालिका आयुक्‍तांनी कर वसुलीसाठी 94 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली. मात्र, त्यापैकी 25 हून अधिक कर्मचाऱ्यांनी वसुलीच्या कामाला नकार दिला. त्यानुसार सामान्य शाखेला अहवाल दिला असून त्यांचे वेतन थांबविले आहे. हद्दवाढ भागातील काही कर्मचाऱ्यांवर अशीच कारवाई केली आहे. 
- प्रदीप थडसरे, कर संकलन अधिकारी, सोलापूर महापालिका 

अर्रर्र ! वसुलीला आले नाहीत म्हूणन अडविला पगार 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 447 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्टे ठेवले. परंतु, मागील 11 महिन्यांत 159 कोटींचीच वसुली झाली आहे. मार्चएण्डपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे, या हेतूने आयुक्‍तांनी हद्दवाढ भाग व शहरासाठी 190 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली. मात्र, त्यापैकी 53 कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचा अहवाल कर संकलन कार्यालयने सामान्य शाखेला सुपूर्द केला. त्यानुसार या कर्मचाऱ्यांचा पगार थांबविण्यात आला आहे. 

हेही नक्‍की वाचा : असाही निर्णय ! प्रवासी नसल्यास जागेवरच थांबणार लालपरी 


महापालिकेने कर आकारणी विभागाला 155 कोटींचे तर हद्दवाढ विभागाला 125 कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्टे दिले. त्यानुसार कर आकारणी विभागाने आतापर्यंत 62 कोटी 57 लाखांची वसुली केली असून हद्दवाढ विभागाने 52 कोटी 72 लाखांचा कर गोळा केला आहे. गलिच्छ वस्ती सुधार विभागाला साडेनऊ कोटींचे उद्दिष्ट असून स्थानिक संस्था कर विभागाला 11 कोटींचे तर भूमी व मालमत्ता विभागाला 43 कोटी सात लाखांचे आणि नगरअभियंता विभागाला 79 कोटी 91 लाखांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या विभागांचीच वसुली कमी आल्याने विकासकामांना कात्री लावली. दरम्यान, कर वसुली अन्‌ कर संकलनासाठी महापालिका आयुक्‍तांनी सुमारे 190 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली. जेणेकरून मार्चएण्डपर्यंत समाधानकारक वसुली होईल, असा विश्‍वास होता. मात्र, त्यापैकी 53 कर्मचारी आयुक्‍तांचा आदेश डावलून वसुलीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. त्याची गंभीर दखल घेऊन कर संकलन अधिकाऱ्यांनी सामान्य शाखेला अहवाल दिला. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा निर्णय आयुक्‍तांनी घेतला. 

हेही नक्‍की वाचा : अवकाळीच्या मदतीपासून बळीराजा मदतीपासून दूरच : नऊशे कोटींचे वाटप नाही 


ठळक बाबी... 

  • फेब्रुवारीच्या 27 दिवसांत 15 कोटी 9 लाख रुपयांची वसुली 
  • कर आकारणी विभागाने संकलित केला 62 कोटी 57 लाखांचा कर 
  • गलिच्छ वस्ती सुधार विभागाची वसुली दोन कोटी 82 लाख रुपये 
  • हद्दवाढ भागातून 52 कोटी 72 लाखांची वसुली : उद्दिष्टपूर्तीसाठी 72 कोटींच्या वसुलीची गरज 
  • भूमी व मालमत्ता विभाग वसुलीत मागे : उद्दिष्ट 47 कोटी सात लाखांचे अन्‌ वसुली पावणेचार लाख 
  • नगरअभियंता विभागाला 79 कोटी 91 लाखांचे उद्दिष्टे : आतापर्यंत वसुली 29 कोटी 29 लाखांचीच 

हेही नक्‍की वाचा : नापासांची पंचाईत ! निकालानंतरही मिळेना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी 

go to top