एकाच दिवशी वाखरी कोविड सेंटरमधील 56 रुग्ण झाले कोरोनामुक्त !

अभय जोशी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हॉस्पिटलमध्ये देखील रॅपिड ऍन्टीजेन किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यापासून सुमारे तीन ते चार हजार रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केल्या जाणार आहेत. लोकांनी संसर्ग न लपवता तपासणीसाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. जेणे करुन तपासणी वेळीच होऊन लोकांच्या आरोग्याला होणारा धोका टाळता येऊ शकेल, असे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

पंढरपूर(सोलापूर) : तालुक्‍यातील वाखरी येथील कोविड केअर सेंटरमधून कोरोना आजारातून बरे झालेल्या 56 जणांना आज प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत घरी सोडण्यात आले. 

हेही वाचाः अबब...एवढा व्याजदर ! वीस हजारांसाठी घेतले 12 लाखाचे व्याज अन पुन्हा... 

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हॉस्पिटलमध्ये देखील रॅपिड ऍन्टीजेन किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यापासून सुमारे तीन ते चार हजार रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केल्या जाणार आहेत. लोकांनी संसर्ग न लपवता तपासणीसाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. जेणे करुन तपासणी वेळीच होऊन लोकांच्या आरोग्याला होणारा धोका टाळता येऊ शकेल, असे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

हेही वाचाः अमेरिकन डायमंडच्या देखण्या ज्वेलरी डिझाईनच्या राख्यांनी बाजार फुलला ! 

तालुक्‍यातील वाखरी येथील कोविड केअर सेंटरमधून बरे झालेल्या 56 जणांना आज प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत घरी सोडण्यात आले. त्यानंतर श्री. ढोले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, वाखरी येथील कोविड केअर सेंटरमधून आज 56 जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे. गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले या सर्वांच्या टिममधील लोक पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. तथापी दुर्देवाने सध्या संसर्गाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याविषयी थोडी जरी शंका आली तरी लगेच तपासण्या करुन घेतल्या पाहिजेत. जेणे करुन संसर्ग वाढणार नाही. शासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असताना नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. लोकांनी संसर्ग लपवण्याची वृत्ती टाळून पुढील अडचणी टाळाव्यात असे आवाहन त्यांनी केले.  
 
संपादन ः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the same day, 56 patients at Wakhri Kovid Center became corona free!