शिवतीर्थ पुरस्कार अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यासह सहा जणांना जाहीर 

प्रकाश सनपूरकर
Friday, 23 October 2020

मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.25) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता मुरारजी पेठ भागातील राजर्षी शाहू सभागृह, छत्रपती शिवाजी प्रशाला येथे होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना सोलापूर भुषण शिवतीर्थ पुरस्कार दिला जाणार आहे. या सोहळ्यात श्री.चितमपल्ली यांचे दसरा- निसर्ग पुजा एक धार्मिक संस्कार या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. 

सोलापूरः येथील मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने यावर्षीचा सोलापूर भुषण शिवतीर्थ पुरस्कार अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना देण्यात येणार आहे. तसेच शिवतीर्थ पुरस्कार कोरोना संकटात विशेष कामगिरी करणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ. औदुंबर मस्के, महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, नर्सिग कॉलेजच्या प्राचार्या मनीषा शिंदे, क्रेडाई प्रतिष्ठानचे शशिकांत जेड्डीमनी आणि शारदाश्रम प्रतिष्ठान सोलापूरचे सुहास कदम यांना देण्यात येणार आहे. 

हेही वाचाः तेलुगु भगिनींच्या आवडत्या ब्रतुकम्मा सणाची अख्यायिका 

मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.25) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता मुरारजी पेठ भागातील राजर्षी शाहू सभागृह, छत्रपती शिवाजी प्रशाला येथे होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना सोलापूर भुषण शिवतीर्थ पुरस्कार दिला जाणार आहे. या सोहळ्यात श्री.चितमपल्ली यांचे दसरा- निसर्ग पुजा एक धार्मिक संस्कार या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. 

हेही वाचाः महिलांतील रोगांवर वार करणारी दुर्गा डॉ.अर्चना खरे 

तसेच कोरोना संकटात मोठी कामगीरी बजावणारे डॉक्‍टर व महामारीच्या काळात भुकेल्यांना अन्नाची मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना शिवतीर्थ पुरस्कार दिला जात आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. औदुंबर मस्के, महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या मनिषा शिंदे, क्रेडाई प्रतिष्ठानचे शशिकांत जेड्डीमनी, शारदाश्रम प्रतिष्ठानचे सुहास कदम आदींना पुरस्कार दिला जाईल. शासनाच्या नियमानुसार समाजबांधवांनी मास्क घालून कार्यक्रमास यावे असे आवाहन सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर सपाटे व जनरल सेक्रेटरी महेश माने व सर्व मंडळाने केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivteerth award announced to six persons including forest sage Maruti Chitampally