शॉर्टसर्कीटमुळे दुकान भस्मसात 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 एप्रिल 2020

शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत सर्व प्रकारच्या डाळी, साखर, गहू, ज्वारी, शेंगदाणे, मसाल्याचे पदार्थ, पामतेल, गोडेतेल आणि अन्य किराणा सामान जळून भस्मसात झाले. त्याचबरोबर दुकानात ठेवलेली दोन लाख 13 हजार रुपयांची रोख रक्कमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत दुकानातील फ्रिज व फर्निचर जळून गेले. 

महूद (सोलापूर) : शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत महूद (ता. सांगोला) येथील किराणा दुकान भस्मसात झाले. या आगीत दुकानातील रोख रकमेसह किराणा सामान व फर्निचर असे एकूण साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले. 

हेही वाचा : प्ले स्टोअर मधून ऍप इन्स्टॉल तरी करून पहा 

महूद येथील लवटे गल्लीत लक्ष्मी मंदिरासमोर शिवप्रसाद पोपट महाजन यांचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत सर्व प्रकारच्या डाळी, साखर, गहू, ज्वारी, शेंगदाणे, मसाल्याचे पदार्थ, पामतेल, गोडेतेल आणि अन्य किराणा सामान जळून भस्मसात झाले. त्याचबरोबर दुकानात ठेवलेली दोन लाख 13 हजार रुपयांची रोख रक्कमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत दुकानातील फ्रिज व फर्निचर जळून गेले. 

हेही वाचा : आषाढी पालखी सोहळा रद्द ही केवळ अफवाच 

दुकानच्या बाजूलाच शिवप्रसाद महाजन यांचे घर आहे. दुकानात आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. तोपर्यंत दुकानातील सर्व सामान जळून गेले होते. रोख रक्कम, किराणा सामान, फ्रिज व फर्निचर असे मिळून साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी गणेश भुजबळ, मंडलाधिकारी दिनेश भडंगे, पोलिस पाटील प्रभाकर कांबळे यांनी पंचनामा केला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे येथील सहायक अभियंता बाळकृष्ण खरात यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. किराणा दुकानचे मालक शिवप्रसाद महाजन यांच्या मातोश्री अरुणा पोपट महाजन यांचे केवळ नऊ दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर लगेच दुकानाला आग लागल्याने केवळ नऊ दिवसांत त्यांच्यावर हा दुसरा मोठा आघात आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shop fire in Sangola taluka