बापरे..! साप शिरला पोलिस ठाण्यात; मग पुढे काय झाले वाचा... 

अक्षय गुंड 
गुरुवार, 25 जून 2020

कर्मचाऱ्यांची धावपळ 
माढा पोलिस ठाण्यात ते पण थेट ठाणे अंमलदाराच्या टेबलखाली साप निघल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. पोलिस ठाण्यात साप असल्याचे कळताच नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. 

उपळाई बुद्रूक (ता. माढा, जि. सोलापूर) : शेतात अडगळीच्या ठिकाणी साप निदर्शनास आल्यास नवल वाटत नाही. परंतु, पोलिस ठाण्यातील अंमलदारच्या टेबलखाली जर साप दिसला तर नवलच वाटण्यासारखे आहे. अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा पोलिस ठाण्यात गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे पोलिस ठाण्यातील सर्वांची चांगलीच धावपळ झाली. 
कायमस्वरपी गर्दीचे ठिकाण असलेल्या माढा पोलिस ठाण्यात गुरूवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ठाणे अंमलदारच्या टेबलखाली पोलिस कॉन्सटेबल भारती डांगरे यांना साप निदर्शनास आला. त्यांनी लगेच ठाणे अंमलदार विशाल पोरे यांना याबाबत कल्पना दिली. त्यांनीही वेळ न दवडता व सर्पमित्राची वाट न बघता पोलिस कॉन्सटेबल संजय घोळवे, चंद्रकांत गोरे, श्री. मोरे यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून कपाटाखाली गेलेल्या सापाला बाहेर काढून पकडले व शेतात सोडून दिले. परंतु पोलिस ठाण्यात ते पण थेट ठाणे अंमलदाराच्या टेबलखाली साप निघल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. पोलिस ठाण्यात साप असल्याचे कळताच नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the snake entered the madha police station