रेल्वे कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी ! 260 कोटींची मदत 

0railway_4_0.jpg
0railway_4_0.jpg

सोलापूर : कोरोना या विषाणूचा संसर्ग खंडीत करण्याच्या हेतूने 14 एप्रिलपर्यंत लॉकआउट जाहीर केला आहे. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला असून उपाशीपोटी रात्र झोपून काढणाऱ्यांसाठी रेल्वेच्या 13 लाख कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचे वेतन देण्याचे मान्य केले आहे. कोरोनानंतरच्या उपाययोजनांसाठी रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल 260 कोटी रुपये देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 


22 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अन्नधान्याचा तुटवडा भासत असल्याने आता रेल्वेद्वारे अन्नधान्य पुरवठा केला जात आहे. कोरोनाची भिती असतानाही लॉकडाउनच्या कालावधीत धान्याचा तुटवडा भासू नये या हेतूने माथाडी कामगार व रेल्वेचे कामगार प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने लॉकडाउन काळात शेतकरी, रोजगार हमीवरील मजूर, गोरगरिबांना दिलासा देणारे पॅकेज जाहीर केले. त्यासमवेत आता राजपत्रित अधिकारी, शासकीय नोकदार, सिनेअभिनेत्यांसह अन्य सामाजिक व खासगी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात आता रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. लॉकडाउनमुळे या काळातील पगार मिळेल की नाही, कधीपर्यंत मिळेल, याची खात्री नसतानाही रेल्वे कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचे वेतन देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. 


एक दिवसांचे वेतन दिले 
कोरोना या वैश्‍विक संकटाला देशातून हद्दपार करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य राज्य सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत निमार्ण झालेल्या अडचणींतून पध्दतशीर मार्ग काढताना केंद्र सरकारला अडचणी येवू नयेत, या उद्देशाने रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचे वेतन दिले आहे. 
- प्रदिप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 


ठळक बाबी... 

  • मदतीसाठी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. एल. बैरवा, महासचिव अशोक कुमार यांचा पुढाकार 
  • सेंट्रल रेल्वेच्या तब्बल 13 लाख 27 हजार कर्मचाऱ्यांनी दिला पंतप्रधान आपत्ती निवारण निधीत 260 कोटी 
  • संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद : अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेल्वेद्वारे सुरु झाली धान्य वाहतूक 
  • रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार 14 एप्रिलनंतर वेतन : उत्पन्न वाढीचे सुरु झाले आतापासूनच नियोजन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com