कोरोना नव्हे वेतनाची लागली चिंता ! एसटी कामगार संघटना आक्रमक 

तात्या लांडगे
गुरुवार, 26 मार्च 2020

ठळक मुद्दे... 

  • 14 एप्रिलपर्यंत थांबणार बस स्थानकातच : कार्यालये बंदच 
  • संचारबंदीमुळे वेतनबिल तयार करण्यास अडचणीत : मागील महिन्याप्रमाणे वेतन देण्याची मागणी 
  • लालपरी थांबल्याने एक लाख कर्मचाऱ्यांना लागली वेतनाची चिंता 
  • लॉकडाउनमुळे रजा टाकण्याचा सल्ला : परिवहन मंत्र्यांकडून मिळेना प्रतिसाद 

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी कोरोना या वैश्‍विक संकटामुळे बस स्थानकातच थांबली आहे. 22 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण वाहतूक बंद असल्याने या कालावधीतील वेतन कर्मचाऱ्यांना द्यायचे की रजा खर्ची टाकायच्या, याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. तत्पूर्वी, महामंडळ व कामगार संघटनेच्या करारानुसार महामंडळाला 1 व 7 तारखेला वेतन द्यावेच लागेल, अशी ठाम भूमिका कामगार संघटनेने घेतली आहे. 

हेही नक्‍की वाचा : सकाळ ब्रेकिंग ! जिल्हा परिषद, माध्यमिक शाळांमध्ये विलगीकरण कक्ष 

महामंडळाचे कर्मचारी संकटकालीन परिस्थितीत नेहमी धावून येतात. कामगार संघटनेने प्रशासनासमवेत केलेल्या करारातील तरतुदीनुसार कोणत्याही कारणास्तव एसटी बस बाहेर जावू न शकल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याची तरतूद आहे. त्यामुळे महामंडळाने कामगारांना वेतन देणे क्रमप्राप्त आहे. संचारबंदी असल्याने वेतनबिल तयार करणारे कर्मचारी कार्यालयात हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे महामंडळाने मागील महिन्यातील बिलाप्रमाणे आता 1 व 7 एप्रिलला कर्मचाऱ्यांचे वेतन बॅंकेत जमा करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष संदिप शिंदे यांनी केली आहे. दुसरीकडे महामंडळाने अद्याप तोंडावर बोट ठेवल्याने कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर लालपरीच्या कर्मचाऱ्यांसमोर वेतनाचे संकट निर्माण होईल, अशी स्थिती दिसून येत आहे. याबाबत परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

हेही नक्‍की वाचा : धक्‍कादायक ! कोरोनाची भिती तरीही लाचेचे 63 गुन्हे 

वेतनाबाबत अद्यापही निर्णय नाही 
कोरोनाला हद्दपार करण्याच्या हेतूने 31 मार्चपर्यंत थांबवलेली लालपरीची वाहतूक आता 14 एप्रिलपर्यंत बंदच राहणार आहे. मात्र, या कालावधीत कर्मचाऱ्यांना वेतन द्यायचे की नाही याबद्दल निर्णय झालेला नाही. 
- राहूल तोरो, वाहतूक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई 

हेही नक्‍की वाचा : आश्‍चर्यकारक ! 48 तासांत कोरोनाशिवाय अन्य गुन्हाच नाही 

ठळक बाबी... 
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे आहेत एक लाख 5 हजार कर्मचारी 
- कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी होतो दरमहा 92 कोटींपर्यंत खर्च 
- कोरोनामुळे लालपरीची वाहतूक 22 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत राहणार बंद 
- कर्मचाऱ्यांना या कालावधीत रजा टाकण्याच्या महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना 
- वेतन करारानुसार महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावेच लागेल : कामगार संघटना ठाम 

हेही नक्‍की वाचा : मोठी बातमी ! 14 एप्रिलपर्यंत रेल्वे पूर्णपणे बंदच : 26 हजार कोटींचा फटका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worried about wages not Corona the ST labor union is aggressive