कोरोना सदोष अहवाल ; जिल्हाधिकारी करणार चौकशी

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 20 मे 2020

रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य मिळण्याचे संकेत 
पिवळ्या रेशन कार्डधारकांना रेशनमधून मोफत धान्य मिळत आहे. केशरी कार्डधारकांनाही मोफत धान्य मिळावे, अशी मागणी नगरसेविका शहाजिदाबानो शेख यांनी केली. त्यावेळी, या संदर्भातील धोरण शासनस्तरावर होतात. त्यामुळे शासन जशा सूचना देईल, तसे नियोजन करण्यात येईल. तसेच रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यानुसार कार्यवाही होईल, असे यावेळी सांगण्यात आल्याचे नगरसेविका शेख यांनी सांगितले.

सोलापूर : कोरोना रुग्णांबाबत सदोष अहवाल प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. यातील दोषींवर निश्‍चित कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. सदोष अहवालाबाबत "दुपारी निगेटिव्ह, रात्री पॉझिटिव्ह' ही बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याचा संदर्भ देत नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी या संदर्भात प्रश्‍न उपस्थित केल्यावर श्री. शंभरकर यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. 

वाचा मूळ बातमी ः सोलापुरात दुपारी निगेटीव्ह, रात्री पाॅझिटीव्ह

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात बुधवारी रात्री अतिकोरोनो बाधित भागातील नगरसेवकांची तसेच विभागीय अधिकारी यांची बैठक झाली. यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, नगरप्रशासन अधिकारी पंकज जावळे, महापालिकेतील सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक रियाज खरादी, शिवानंद पाटील, संतोष भोसले, भारतसिंग बडुरवाले, नरसिंग कोळी, नगरसेविका शहाजिदाबानो शेख, श्रीनिवास पुरुड, नगर अभियंता संदीप कारंजे, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, नगरसचिव रुऊफ बागवान, सिद्धेश्‍वर बोरगे उपस्थित होते. 

हेही वाचा - कोरोनाग्रस्त मटन विक्रेत्याची संपर्कसाखळी मोठी

तावरे यांनी महापालिकेतर्फे कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी केल्या जात असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नागरिक उशिरा उपचारासाठी येतात. उपचारासाठी लवकर यावे, आजार लपवले जाऊ नये यासाठी नगरसेवकांनी प्रभागात नागरिकांचे समुपदेशन करावे, आपल्या प्रभागातील खासगी डॉक्‍टरांना प्रतिबंधित क्षेत्र वगळून दवाखाने सुरू करण्याचे आवाहन करावे, असे सांगितले. पोलिस आयुक्त शिंदे यांनी नगरसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

हेही वाचा - महापालिकेची तिजोरी भरू लागली

रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य मिळण्याचे संकेत 
पिवळ्या रेशन कार्डधारकांना रेशनमधून मोफत धान्य मिळत आहे. केशरी कार्डधारकांनाही मोफत धान्य मिळावे, अशी मागणी नगरसेविका शहाजिदाबानो शेख यांनी केली. त्यावेळी, या संदर्भातील धोरण शासनस्तरावर होतात. त्यामुळे शासन जशा सूचना देईल, तसे नियोजन करण्यात येईल. तसेच रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यानुसार कार्यवाही होईल, असे यावेळी सांगण्यात आल्याचे नगरसेविका शेख यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corona news ; collector take action