तिच्या 'या' भागावरुन रिक्षाचालकाने फिरवला हात अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

सोलापूर : घरासमोरील पार्क केलेल्या रिक्षात मुलींसमवेत अल्पवयीन मुलगी खेळत होती. त्यावेळी आरोपी त्याच्या रिक्षातून त्याठिकाणी आला. माझी मुलीने काळ्या रंगाची फ्रॉक घातली होती. त्या रिक्षा चालकाने त्या मुलीला जवळ बोलावले. मुलीजवळ जावून आरोपीने तिच्या मागील बाजूस हात फिरवला. त्यानंतर ती मुलगी तेथून घरात गेली आणि सर्व हकीकत आईला सांगितली. त्या मुलीच्या आईने तत्काळ विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. 

सोलापूर : घरासमोरील पार्क केलेल्या रिक्षात मुलींसमवेत अल्पवयीन मुलगी खेळत होती. त्यावेळी आरोपी त्याच्या रिक्षातून त्याठिकाणी आला. माझी मुलीने काळ्या रंगाची फ्रॉक घातली होती. त्या रिक्षा चालकाने त्या मुलीला जवळ बोलावले. मुलीजवळ जावून आरोपीने तिच्या मागील बाजूस हात फिरवला. त्यानंतर ती मुलगी तेथून घरात गेली आणि सर्व हकीकत आईला सांगितली. त्या मुलीच्या आईने तत्काळ विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. 

हेही नक्‍की वाचा : गूड न्यूज ! सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळणार रोखीने 

सोलापुरात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर दहा जणांनी (रिक्षाचालक) सामुहिक अत्याचार केल्याची घटना याच पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली होती. त्यानंतर मजरेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवरही अत्याचार झाला आहे. याविरुध्द शहरात विविध संघटनांनी आंदोलने केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या गुन्ह्यांमधील आरोपींवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, सोलापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग व अत्याचाराची फेब्रुवारीतील ही तिसरी घटना आहे. फिर्यादीच्या वडिलांनी घरासमोर पार्क केलेल्या रिक्षात लहान मुली खेळत असताना आरोपी रिक्षातून त्याठिकाणी आला होता. त्याने माझ्या मुलीच्या फ्रॉकवरुन मागील बाजूवरून हात फिरवला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुध्द पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

हेही नक्‍की वाचा : फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय 'महाविकास'च्या रडारवर 

घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्‍तांची भेट 
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या सोलापुरात दोन घटना घडल्या आहेत. त्या घटनांमधील आरोपींवर कारवाई सुरु असतानाच आता अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर सहायक पोलिस आयुक्‍त प्रिती टिपरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे व सहायक पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. शेडगे यांनी दिली. 

हेही नक्‍की वाचा : मोदी सरकारचा पोस्टाच्या बचत खातेदारांना दणका 

भाजपतर्फे मंगळवारी राज्यव्यापी धरणे 
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसह राज्यातील महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचाराचा भाजपने निषेध केला आहे. हिंगणघाट, पुण्यातील घटना ताजी असतानाच सोलापुरातील दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. रविवारी (ता. 23) एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याविरुध्द आता भाजपतर्फे राज्यातील सर्व तहसिल कार्यालयांबाहेर 25 फेब्रुवारीला (मंगळवारी) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur crime Disgrace of a minor girl